..अन् रस्त्यावरच मांडला ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:26 AM2018-02-23T00:26:11+5:302018-02-23T00:26:35+5:30

वाहतूक शाखेच्या वतीने अन्यायकारक पद्धतीने पावत्या फाडून ग्रामीण भागातील जनतेला त्रस्त केले जात असल्याचा आरोप करून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप घुगे यांनी इंदिरा गांधी चौक परिसरात चक्क रस्त्यावरच ठिय्या मांडला. पंधरा मिनिटे वाहतुकीवर परिणाम झाला.

 Just standing on the road | ..अन् रस्त्यावरच मांडला ठिय्या

..अन् रस्त्यावरच मांडला ठिय्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वाहतूक शाखेच्या वतीने अन्यायकारक पद्धतीने पावत्या फाडून ग्रामीण भागातील जनतेला त्रस्त केले जात असल्याचा आरोप करून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप घुगे यांनी इंदिरा गांधी चौक परिसरात चक्क रस्त्यावरच ठिय्या मांडला. पंधरा मिनिटे वाहतुकीवर परिणाम झाला.
हिंगोलीत वाहतूक नियमांचे उल्लंखन करणाºयांविरुद्ध वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई सुरू आहे. विनापरवाना वाहन चालविणे, परवानगीपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहन चालविणे, विनाक्रमांकाची गाडी चालविणे, अवैध पार्किंग आदीसंदर्भात ही कारवाई सुरू आहे. मागील काही दिवसांपासून अधून-मधून ही कारवाई केली जाते. आजही तीच कारवाई सुरू असताना घुगे यांनी अचानक आंदोलन केले. ग्रामीण भागातील काहींना अडविल्यानंतर हा प्रकार घडला.
याबाबत शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक मैराळ म्हणाले, वाहतूक शाखेची कारवाई नियमित सुरू राहील. यात कोणाचीही गय केली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाºयांवरच कारवाई केली जाते, असेही त्यांनी सांगितले.
हिंगोलीत दररोजच वाहतूक शाखेतर्फे विविध कारणांनी लोकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यापेक्षा या शाखेला दंडात जास्त रस आहे. गांधी चौक ते अग्रसेन चौकात वाहतुकीची बेशिस्त सर्रास दिसते. यात सुधारणा केल्यास त्यांचे स्वागत आहे. मात्र सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. या आडवा-आडवीत या विद्यार्थ्यांनाही सोडले जात नाही. वाहतूक शाखेच्या या मनमानीत एखाद्याला परीक्षेला मुकावे लागले तर हा गंभीर प्रकार आहे. त्यामुळेच हे आंदोलन केले, असे युवा सेना जिल्हाप्रमुख दिलीप घुगे यांनी सांगितले.

Web Title:  Just standing on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.