निवडणुकीदरम्यान कडेकोट बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:42 PM2019-09-23T23:42:56+5:302019-09-23T23:43:22+5:30
विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून २१ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असून २१ सप्टेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून थेट कारवाई केली जाणार असून हिंगोली जिल्ह्यात पोलीस प्रशासनाचे १२ तर महसूलचे चार असे एकूण १६ पॉर्इंटवर कडेकोट बंदोबस्त असणार आहे.
निवडणुकीच्या कालावधीत पोलीस प्रशासनाकडून विविध कारवाया केल्या जातात. निवडणुक ते निकाल जाहिर होईपर्यंत पोलीस प्रशासनाला सज्ज राहावे लागते. त्या अनुषंगानेच आता विधानसभा २०१९ निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून पोलीस प्रशासनाची जिल्ह्यावर करडी नजर असणार आहे. पोलीस बंदोबस्त, रूटींगच्या कारवाया व पेट्रोलिंगचे नियोजन केले आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र जिल्हाभरात कडेकोट बंदोबस्त संदर्भात संबधित ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना कडक सूचनाही देण्यात आल्या आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलीस प्रशासनाला दक्ष राहावे लागणार आहे. दरम्यान आचारसंहितेचा भंग, आपसातील भांडण व हाणामाºया, दारूची चोरटी वाहतूक करणाºयांविरूद्ध कडक कारवाई केली जाणार आहे. ठिक - ठिकाणी पार्इंटवर पेट्रोलिंग केली जाणार असून यावेळी वाहनांची कसूचन तपासणी केली जाणार आहे. या पथकात पोलीस अधिकारी व महसूलचे अधिकाºयांचा समावेश असणार आहे.
जिल्ह्यात १२ ठिकाणी पॉर्इंट
बाहेरील जिल्ह्यातून हिंगोली जिल्ह्याच्या हद्दीत येणाºया वाहनांची तपासणी केली जाईल. यासाठी हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर विविध ठिकाणी १२ पॉर्इंटवर पोलीस व महसूलचे अधिकारी हजर असतील. पथकाद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे. यामध्ये गोरेगाव ठाणे हद्दीतील करेगावनाका येथील पॉर्इंटवर पथक तैनात असेल. तसेच सेनगाव-वाढोणा फाटा येलदरी टी पॉर्इंट, औंढा जिंतूर रोड रामेश्वर पाटी, हयातनगर टी पॉर्इंट, वसमत ते बाभूळगाव पूर्णा रोड, वसमत ते आसेगाव नांदेड जाणारा मधला रस्ता, वसमत ते नांदेड जिंतुर टी पार्इंट, आखाडा बाळापूर ते नांदेड हिवरा पाटी टी पॉर्इंट तसेच कळमनुरी ते वसमत गऊळबाजार पॉर्इंट इ. ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे.
पेट्रोलिंगदरम्यान दोषी आढळणाºयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. तर इतर चार ठिकाणी महसूलचे स्वतंत्र पथक तैनात असेल.