कलशयात्रेने महायज्ञास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:28 AM2018-12-25T00:28:29+5:302018-12-25T00:28:52+5:30
सोमवारी सकाळी ८ वाजता गोपाललाल मंदिर येथे ११०० महिलांनी कलश पूजन व गो पूजन करून कलशयात्रेची सुरूवात केली. ही यात्रा मारवाडीगल्ली, कापडगल्ली, फुलमंडई, महावीर चौक, गांधी चौक, जवाहर रोड, शास्त्रीनगर, अकोला रोड, रिसाला बाजार येथून यशवंत नगर, सावरकरनगर, जिजामाता नगरमार्गे गायत्री शक्तीपीठ येथे दुपारी १२ वाजता पोहचली. यामध्ये वंजारी समाजातर्फे भगवान बाबा संघाच्या वतीने विठ्ठल- रूख्मीनीचा देखावा सादर केला. नरहर सोनार समाजातर्फे ग्रंथदिंडी सादर केली. रामाकृष्णा शाळेच्या मुलींनी वारकरी गणवेशात दिंडी काढली.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली: सोमवारी सकाळी ८ वाजता गोपाललाल मंदिर येथे ११०० महिलांनी कलश पूजन व गो पूजन करून कलशयात्रेची सुरूवात केली.
ही यात्रा मारवाडीगल्ली, कापडगल्ली, फुलमंडई, महावीर चौक, गांधी चौक, जवाहर रोड, शास्त्रीनगर, अकोला रोड, रिसाला बाजार येथून यशवंत नगर, सावरकरनगर, जिजामाता नगरमार्गे गायत्री शक्तीपीठ येथे दुपारी १२ वाजता पोहचली. यामध्ये वंजारी समाजातर्फे भगवान बाबा संघाच्या वतीने विठ्ठल- रूख्मीनीचा देखावा सादर केला. नरहर सोनार समाजातर्फे ग्रंथदिंडी सादर केली. रामाकृष्णा शाळेच्या मुलींनी वारकरी गणवेशात दिंडी काढली. व्यसनमुक्तीवर आधारित देखावा पैठण येथील गायत्री परिवारातर्फे सादर केला. तर ही कलश यात्रा गोपाललाल मंदिर ते गायत्री शक्तीपीठ ४ कि.मी.अंतर चालून शिस्तबद्ध पद्धतीने काढली. जागोजागी शरबत, दुधाची व्यवस्था नागरिकांनी केली. तसेच मेहकर येथील राम बारोटे यांनी विविध रेखाटलेल्या रांगोळ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले होते. कलशयात्रा गायत्री मंदिर येथे पोहचल्यावर पुष्पाने स्वागत करण्यात आले. गायत्री शक्तीपीठ हरिद्वार येथून आलेल्या प्रतिनिधींनी मंत्रोउच्चाराने कलशाचे पूजन केले. तर नंतर गायत्री मातेची आरती झाली. प्रसादाची व्यवस्था केली होती. यात आदर्श महाविद्यालयाचे एनसीसीचे विद्यार्थी व स्काऊटचे विद्यार्थी व शिक्षकही सहभागी झाले होते.