कळमनुरी ग्रामीण रुग्णालय पुन्हा प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:07 AM2018-03-09T00:07:08+5:302018-03-09T00:07:28+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य विभागातील जिल्हास्तरीय पुरस्कारांद्वारे परिचारीकांचा सन्मान करण्यात आला. यात कळमनुरी ग्रामीण रुग्णालयाला पुन्हा प्रथम पुरस्कार मिळाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य विभागातील जिल्हास्तरीय पुरस्कारांद्वारे परिचारीकांचा सन्मान करण्यात आला. यात कळमनुरी ग्रामीण रुग्णालयाला पुन्हा प्रथम पुरस्कार मिळाला.
यावेळी जि. प. अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सीईओ एच.पी. तुम्मोड, महिला व बालकल्याण सभापती रेणुकाताई जाधव, बाबा नाईक, विठ्ठल चौतमल, डॉ.सतीश पाचपुते, डॉ.राहुल गिते, भानुदास जाधव आदींची उपस्थिती होती.
६ उपकेंद्रांना प्रशस्तीपत्र
जिल्ह्यातील सहा उपकेंद्रांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्रक देवून त्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये जवळा बाजारमधील उपकेंद्र पोटा, डोंगरकडामधील उपकेंद्र सुकळी, उपकेंद्र वारंगा, आखाडा बाळापूरअंतर्गतचे उपकेंद्र शेवाळा, कापडसिनगीअंतर्गतचे उपकेंद्र बन यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र
तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना उत्तेजनार्थ पारितोषिक दिले. यात पिंपळदरी, लोहरा आणि मसोड येथील आरोग्य केंद्राचा समावेश आहे. तर ग्रामीण रुग्णालय औंढा नागनाथला उत्तेजनार्थ तर वैयक्तीक पुरस्कार मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील आशा क्षीरसागर यांना पारितोषिक दिले.
फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार
जिल्हास्तरीय उत्कृष्ट पुरस्कारामध्ये सामान्य रुग्णालयातील ज्योती पवार प्रथम, आखाडा बाळापूर आरोगय केंद्रातील विजयमाला आल्लडवाड द्वितीय आणि साखरा आरोग्य केंद्रातील प्रीती काकडे यांना तृतीय पुरस्कार मिळाला.
एल. एच. व्ही.
एलएचव्हीमध्ये तिघींना प्रथम पुरस्कार विभागून दिला. यात पानकनेरगावच्या रागिणी शेजूळ, जवळा बाजारच्या सी. बी. लोंढे, पिंपळदरीच्या शांता वागतकर तर द्वितीय बाळापूरच्या आशा कांबळे आणि पोत्र्याच्या एस. बी. सोरणी या तृतीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
एएनएममधून कवठा येथील केंद्राच्या पूनम चाटसे प्रथम, शेवाळ्याच्या मुक्ता मुंढे द्वितीय, फाळेगावच्या पी. डी. देशपांडे आणि पोत्रा येथील ए. के. मारकळ तृतीय.
फ्लोरेन्स नाईटिंगेल उत्तेजनार्थ प्रशस्ती पुरस्काराच्या १४ जणी मानकरी ठरल्या. यामध्ये जवळा बा.च्या शीतल पतंगे, सामान्य रुग्णालयाच्या रागिणी जोशी, फाळेगाव केंद्राच्या पी. के. इंगोले, वाकोडीच्या उषाताई पाटे, बसंबाच्या व्ही. एस. सेवलकर, जलालधाबा शोभा शिंदे, आडगावच्या पी. बी. हानवते, जामगव्हाणच्या सुजाता लवटे, जवळा बाजारच्या सुलोचना लिलर्वे, गिरगावच्या के. एम. राखे, गौळबाजार सीमा मोरे, मोरवडच्या व्ही. एस. गोमासे, कुर्तडीच्या एस. डी. पाटील आणि वाईच्या मोना विल्यम्स यांचा समावेश आहे.
याशिवाय कुटुंबकल्याणच्या कामासाठी परिचारिका, डॉक्टर व विविध आरोग्य संस्थांनाही सन्मानित करण्यात आले.
सर्वोत्कृष्ट आरोग्य संस्थांअंतर्गत उपकेंद्रात वाकोडी पीएचसीअंतर्गत गौळ बाजार उपकेंद्रास प्रथम १५ हजार व स्मृती चिन्ह, पांगरा शिंदे पीएचसीअंतर्गत उपकेंद्र वाई -द्वितीय १० हजार, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह. पिंपळदरी पीएचसीअंतर्गतचे उपकेंद्र जामगव्हाणला तृतीय ५ हजार, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असा पुरस्कार मिळाला.
प्रा. आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयांमधून प्रा. आरोग्य केंद्र गोरेगावला प्रथम पुरस्कार २५ हजार, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह. प्रा. आ. पोत्रा यांना द्वितीय १५ हजार, गिरगावला तृतीय १० हजार तर ग्रामीण रुग्णालय कळमनुरीला प्रथम ५० हजारांचा पुरस्कार मिळाला.