कयाधू नदीच्या पुराचा देवजना गावाला वेढा; २० ग्रामस्थ अडकले, शेडवर चढून वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 12:16 PM2024-09-02T12:16:26+5:302024-09-02T12:23:37+5:30

कळमनुरी तालुक्यातील देवजना गावाला पुराचा वेढा असल्याने शिवारातील २० मजूर शेतात अडकले आहेत.

Kayadhu river flood surrounds Devjana village; 20 villagers were stuck in the field since midnight | कयाधू नदीच्या पुराचा देवजना गावाला वेढा; २० ग्रामस्थ अडकले, शेडवर चढून वाचवले प्राण

कयाधू नदीच्या पुराचा देवजना गावाला वेढा; २० ग्रामस्थ अडकले, शेडवर चढून वाचवले प्राण

आखाडा बाळापूर ( हिंगोली): दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कयाधू नदीने रौद्ररूप धारण केले आहे. रविवारी मध्यरात्री १२ वाजेनंतर कयाधू नदीला महापूर आला आहे. अनेक शेतांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. पुराच्या विळाख्याने आखाड्यांवर राहणारे मजूर शेतामध्येच अडकले आहेत. 

कळमनुरी तालुक्यातील देवजना गावाला पुराचा वेढा असल्याने शिवारातील २० मजूर शेतात अडकले आहेत. मजुरांनी शेतातील टिन पत्र्याच्या शेडवर जाऊन जीव वाचवला. दरम्यान, तहसीलदार जीवक कांबळे यांनी देवजना गावाला भेट देऊन पाहणी केली . आपत्कालीन सुरक्षारक्षकांना पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफचे जवान येऊन लवकरच या लोकांची सुटका करतील असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे. 

जनावरांसाठी दोघे शेतात थांबले
डोंगरगाव पूल येथील चार जण पुराच्या विळख्यात अडकले होते. त्यातील दोघांना सूरक्षीत बाहेर काढण्यात आले आहे . तर दोघेजण शेतात बांधलेल्या जनावरांना सोडण्याचा प्रयत्न करत पुराच्या पाण्यातच थांबले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. कयाधू नदीला आलेल्या मोठ्या पुराचा परिसरातील अनेक गावांना फटका बसला आहे.

Web Title: Kayadhu river flood surrounds Devjana village; 20 villagers were stuck in the field since midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.