केशवराव भोसले स्मृती शताब्दीनिमित्त ऑनलाईन गीत महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:26 AM2021-01-17T04:26:08+5:302021-01-17T04:26:08+5:30
फेब्रुवारी २०२१ ला होणाऱ्या गीतमहोत्सवाची जबाबदारी यावेळी हिंगोली जिल्ह्याने घेतली आहे. फेब्रुवारी महिन्यात तुकाराम बीज आणि शिवजयंती असल्यामुळे ‘तुकोबांचे ...
फेब्रुवारी २०२१ ला होणाऱ्या गीतमहोत्सवाची जबाबदारी यावेळी हिंगोली जिल्ह्याने घेतली आहे. फेब्रुवारी महिन्यात तुकाराम बीज आणि शिवजयंती असल्यामुळे ‘तुकोबांचे अभंग आणि शिवरायांची स्फूर्ती गीते’ अशी संकल्पना निवडण्यात आली आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी कोणतेही बंधन नसून सर्वांसाठी खुली आहे. तसेच प्रवेश मूल्यही असणार नाही. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना तुकोबांचा अभंग अथवा शिवरायांचे स्फूर्तीगीत यापैकी एका किंवा दोन्ही विषयांवर आधारित जास्तीतजास्त फक्त दोन व्हिडिओ तयार करून पाठवावयाचे आहेत. व्हिडिओ महोत्सवासाठीच केलेला असावा. वाद्ये किंवा कराओकेचा वापर मान्य केला जाईल. आलेल्या व्हिडिओमधून ३० व्हिडिओ प्रक्षेपण करण्याचे समिती ठरविणार आहे. सहभागी सर्व कलावंतांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी नाव, गाव, जन्मतारीख यांचा समावेश करणारी प्रवेशिका तयार करून उमाकांत पैंजणे, राजेंद्र पाटील, कुंडलिकराव शिंदे यांच्या व्हॉटस्अप नंबरवर पाठवावे, असे आवाहन परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष वर्षा धाबे, हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रा. जयप्रकाश पाटील गोरेगावकर, जिल्हा व तालुका कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मा. शि. कोटकर, निलेश रमेश होनाळे यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.