खरीप हंगामात भाजीपाल्यासाठी गादीवाफे करावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:51+5:302021-06-06T04:22:51+5:30

हिंगोली: खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादीवाफे तयार करुन घ्यावेत, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा ...

In kharif season, make mattresses for vegetables | खरीप हंगामात भाजीपाल्यासाठी गादीवाफे करावीत

खरीप हंगामात भाजीपाल्यासाठी गादीवाफे करावीत

Next

हिंगोली: खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादीवाफे तयार करुन घ्यावेत, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने केले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय नवीन पिकांची लागवड करु नये. शेतातील अंतरमशागतीची कामे राहिली असल्यास पाऊस पडण्यापूर्वी ती आटोपून घेणे गरजेचे आहे. मृग बहारासाठी बागेतील वाळलेल्या फांद्या व रोगग्रस्त फांद्या काढून टाकाव्यात. खरीप हंगामामध्ये फूल पिकांच्या लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादीवाफे तयार करुन घ्यावीत. तसेच मका चारा पिकाच्या लागवडीसाठी आफ्रीकन टॉल, मांजरी, कंपोझीट, विजय, गंगासफेद, डेक्कन हायब्रीड या वाणांची निवड करुन घ्यावी.

खरीप हंगामातील पिके चांगली येण्यासाठी शेतीची मशागत चांगल्या पद्धतीने करुन घेऊन काडीकचरा शेतात शिल्लक राहिल्यास तो वेचून घेणेही गरजेचे आहे.

शेती मशागतीची कामे करतेळेस वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अधिकचा पाऊस येत असेल तर मशागतीची कामे थांबवावीत. यानंतर पावसाचा वादळे वारे व पावसाचा अंदाज घेऊन सकाळच्यावेळी शेतातील कामे उरकून घ्यावीत, असे आवाहनही ‘वनामकृ’ विद्यापीठाने केले आहे.

Web Title: In kharif season, make mattresses for vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.