खून करून शेतकऱ्याचा मृतदेह शिवारात फेकला; पत्नी अन् तिच्या दोन प्रियकरांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 07:16 PM2024-06-03T19:16:07+5:302024-06-03T19:16:26+5:30

तपासानंतर पोलिसांनी शेतकऱ्याची पत्नी आणि तिच्या दोन प्रियकरांना ताब्यात घेतले आहे.

Killed and threw the farmer's body into the farm filed; Wife and her two lovers arrested | खून करून शेतकऱ्याचा मृतदेह शिवारात फेकला; पत्नी अन् तिच्या दोन प्रियकरांना अटक

खून करून शेतकऱ्याचा मृतदेह शिवारात फेकला; पत्नी अन् तिच्या दोन प्रियकरांना अटक

कळमनुरी (जि. हिंगोली) : तालुक्यातील मसोडफाटा येथील शेत शिवारात आज सकाळी ७ वाजता एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. दरम्यान,  अनैतिक संबंधाच्या कारणावरुन हा खून करण्यात आल्याची माहिती तपासाअंती पोलिसांनी दिली. तसेच पोलिसांनी संशयित म्हणून मयताची पत्नी व तिच्या दोन प्रियकरांना ताब्यात घेतले आहे.

कळमनुरी तालुक्यातील शिवणी (खुर्द) येथील शेतकरी नामदेव तुकाराम मिरासे (वय ४५) यांचे गावापासून काही अंतरावर असलेल्या मसोडफाटा शिवारात शेत आहे. रविवारी रात्रीच्या वेळी नामदेव मिरासे हे त्यांच्या शेतात गेले होते. ३ जून रोजी सकाळी सात वाजता काही तरुणांनी नामदेव मिरासे यांचा मृतदेह रस्त्यालगत शेतात पाहिला. त्यांनी लगेच पोलिसांना ही माहिती दिली. 

यानंतर पोलिस निरीक्षक मोहन भोसले, उपनिरीक्षक गजानन कांगणे, जमादार माधव भडके, देवीदास सूर्यवंशी, माधव डोखळे, शकुराव बेले, रामा शेळके, शिवाजी देमगुंडे, प्रशांत शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली. त्यानंतर सदर मृतदेह तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. यानंतर हा खुनाचा प्रकार असल्याचे उघडकीस आले. 

तीन आरोपींना केली अटक...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष भूमिका बजावून चार तासाच्या आत खुनाचा उलगडा करून ३ आरोपींना अटक केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलिस अंमलदार नितीन गोरे, नरेंद्र साळवे, आजम प्यारेवाले, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे, सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, पोलिस उपनिरीक्षक गजानन कागणे विमल होगे, पोले आदींच्या पथकाने तपासाकामी सहकार्य केले.

Web Title: Killed and threw the farmer's body into the farm filed; Wife and her two lovers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.