हिंगोली जिल्ह्यातील १०४ शेतक-यांना ‘कृषिरत्न पुरस्कार’ प्रदान...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:57 AM2019-09-10T00:57:03+5:302019-09-10T00:57:41+5:30
शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया १०४ शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे ९ सप्टेंबर रोजी ‘कृषिरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हिंगोली शहरातील महावीर भवन येथे पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया १०४ शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे ९ सप्टेंबर रोजी ‘कृषिरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हिंगोली शहरातील महावीर भवन येथे पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती संजय भैय्या देशमुख हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जि. प. उपाध्यक्ष अनिल पतंगे आदी उपस्थित होते. यावेळी समाज कल्याण समिती सभापती सुनंदाताई नाईक, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती प्रल्हाद राखोंडे, जिल्हा कृषी अधीक्षक विजय लोखंडे, जि. प. कृषी अधिकारी अंकुश डुब्बल, डॉ. पी. पी. शेळके, डॉ. आनंद गोरे, डॉ. राजेश भालेराव, डॉ. ओळंबे, डॉ. सुगावे आदी पुरस्कार सोहळा कार्यक्रमास हजर होते. यावेळी डॉ. राजेश भालेराव व डॉ. गोरे यांनी उपस्थित शेतकºयांना शेतीविषयक सखोल मार्गदर्शन केले. कन्या प्रशालेच्या राठोड व शाळेतील विद्यार्थिनींनी यावेळी सहकार्य केले.
जिल्ह्यातील या शेतकºयांना प्रदान करण्यात आला पुरस्कार
पुरस्कार वितरण कार्यक्रमात रंजना मच्छिंद्र दराडे, प्रेमदास भोजा चव्हाण, शिवाजी धोंडबाराव बिरगड, कैलास मारोतराव चिलगर, पंजाब रूस्तुमराव वरेड, रामदास दामोदर जाधव, राजकुमार खिराप्पा आकमार, विठ्ठल हनमंतराव काळे, संतोष प्रकाश गारकर, दत्तराव मारोतराव गिते, प्रकाश सूर्यभान कदम, गणेश दत्तराव घुगे, रामदास भीमराव मस्के, मल्हारराव ग्यानबाराव घुगे, भगवान नारायण सारंगे, नागेश मुरलीधर कुलकर्णी, लक्ष्मण तुकाराम आमले, कचरूअप्पा सोमाजीअप्पा चन्ने, तुकाराम माणिकराव जोंधळे, रमेश संभाजी लाखाडे, कोंडबाराव आनंदराव हेंद्रे, संभाराव बाबाराव बोंढारे, बालाजी सखाराम जामगे, सुरेश चंदनसिंग ठाकूर, कैलास नामदेव नायक, बापूराव परसराम पाटील, शिवाजी रामराव गायकवाड, भानुदास गोविंदराव आगलावे, माणिक किसन मापारी, प्रकाश श्रीपती मुळे, सुजीत व्यंकटी इंगळे, पंढरीनाथ सखाराम घुगे, जोगेंद्र उद्धव पुरी, संभाजी गोमाजी बंदुके, संभाजी चंपती इंगळे, विठ्ठल शंकर मस्के, श्रीधर फकिरा मस्के, आनंद सखाराम आवटे, नामदेव विठ्ठल भिसे, गोरखनाथ महाजन हाडोळे, पांडुरंग शंकर शिंदे, किसन शेषराव पतंगे, प्रकाश गंगाराम मगर, पुरभाजी लिंबाजी टवले, देवराव बाबाराव करे, रामराव भुजंगराव, रवींद्र सीताराम इंगळे, शोभाबाई वैजनाथ यशवंते, सुरेश नारायण बेंडे, वैजनाथ धोंडजी गायकवाड, प्रभाकर माधवराव माळेवार, चिंतामणी शामराव नवघरे, बळीराम महादेव अंभोरे, लक्ष्मण रंगनाथ झुंझुर्डे, विठ्ठल काशीनाथ होळकर, दिगंबर यशवंत गुंडले, सीताराम रूस्तूम जाधव, गिरमाजी मारोतराव दळवी, केशव वामनराव देलमाडे, दिलीप सोपान राखोंडे, भगवान बापूराव कावळे, राजेंद्र कुुंडलिक दशरथे, निवृत्ती संतोबा वावरे, तातेराव गणाजी सोळंके, गणेश किशन लोंढे, मारोती हारजी पवार, गंगाधर तातेराव कदम, ज्ञानेश्वर दामोदर सोनवणे, दिगंबर होणाजी शेळके, कैलास रंगराव शिंदे, साहेब गोपाळ शिंदे, प्रकाश मुंजाजी कुटे, बालासाहेब किशन बारहाते, नरहरी लिंबाजी कदम, व्यंकटेश देवराव कुसळे, रंगराव देवराव बोखारे, तुकाराम मारोतराव राखोंडे, गंभीर वकील आडे, ज्ञानेश्वर गंगाराम गरड, देविदास आप्पाजी कोरडे, कडूजी विक्रम भवर, लक्ष्मण रायाजी जगताप, प्रताप लक्ष्मीकांत काळे, दामोदर माधवराव जगताप आदींना मान्यवरांच्या हस्ते कृषिरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.