कुरूंद्यात निवडणुकीवरून कार्यकर्त्यांचा राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:45 AM2018-02-27T00:45:29+5:302018-02-27T00:45:32+5:30
येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी होणाºया निवडणुकीवरून झालेल्या हाणामारीत काहींना तलवारीचे मार लागले तर दुचाकी व चार चाकी वाहनांची नासधूस झाली आहे. त्यामुळे वार्र्ड ६ च्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, रविवारी रात्रीला ११.३० वाजता ही घटना घडली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी होणाºया निवडणुकीवरून झालेल्या हाणामारीत काहींना तलवारीचे मार लागले तर दुचाकी व चार चाकी वाहनांची नासधूस झाली आहे. त्यामुळे वार्र्ड ६ च्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, रविवारी रात्रीला ११.३० वाजता ही घटना घडली आहे.
कुरूंदा येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी वार्ड क्र. ६ मध्ये अस्तित्वाची लढाई होत आहे. तालुक्याचे मुख्य केंद्रस्थान असल्याने व गावात प्रमुख पदे असल्यामुळे कुरूंद्यात वर्चस्व कोणाचे या निवडणुकीत स्पष्ट होणार असल्याने नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे. त्यामुळे वार्ड क्र. ६ मध्ये कार्यकर्त्यांचा जत्था प्रचाराला उतरल्याने प्रचाराला आगळेवेगळे स्वरूप आले आहेत. रविवारी रात्री ११.३० च्या सुमारे प्रचार करीत असताना कार्यकर्ते एकमेकासमोर भिडले. शाब्दिक चकमकीवरून हाणामारीची घटना घडली. या हाणामारीत काहींना तलवारीचे मार देखील लागले. वाढलेल्या गोंधळामुळे काहीचार चाकी व १० ते १२ दुचाकीवर दगडफेक झाली. काठ्यांनी काही गाड्यांच्या काचा फोडल्या. या घटनेमुळे वार्ड क्र. ६ मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी डिवायएसपी शशिकिरण काशिद यांनी भेट देऊन पाहणी केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
घटनेची पोलीस डायरीत नोंद झाली आहे. मंगळवारी मतदान होणार असल्याने तणाव परिस्थितीमुळे मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आला आहे.