कुरूंदा ग्रामस्थांनी काढली १०० फूट तिरंगा रॅली

By यशवंत भीमराव परांडकर | Published: August 15, 2023 02:24 PM2023-08-15T14:24:08+5:302023-08-15T14:24:15+5:30

कुरुंदा ( जि.हिंगोली): स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगळी संकल्पना समोर ठेवून १०० फूट झेंडा बनवत त्याची रॅली काढत हर्ष उल्हासाने भारतीय ...

Kurunda villagers took out 100 feet tricolor rally | कुरूंदा ग्रामस्थांनी काढली १०० फूट तिरंगा रॅली

कुरूंदा ग्रामस्थांनी काढली १०० फूट तिरंगा रॅली

googlenewsNext

कुरुंदा ( जि.हिंगोली): स्वातंत्र्य दिनानिमित्त वेगळी संकल्पना समोर ठेवून १०० फूट झेंडा बनवत त्याची रॅली काढत हर्ष उल्हासाने भारतीय स्वतंत्र्य दिन  ग्रामस्थांनी साजरा केला.स्वातंत्र्यदिनानिमित्त कुरुंदावासीयांनी १०० फूट लांब तिरंगा झेंड्याची शिस्तबद्धपणे संपूर्ण गावातून रॅली काढली.  रॅलीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

१०० फूट तिरंगा बनवून त्याची रॅली काढत आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. युवकांच्या संकल्पनेतून १५ आगस्ट रोजी  स्वतंत्र्य दिनानिमित्त शंभर फूट तिरंगा झेंडा बनविण्यात आला. कुरुंदा येथे प्रथमच १०० फूट तिरंगा बनवत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  रॅलीची सुरुवात छत्रपती संभाजी राजे चौक येथून करण्यात आली. भव्य स्वरूपात रॅली काढत स्वतंत्र्य दिनानिमित्त आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

तिरंगा झेंडाचा सन्मानाने फुलांचा वर्षाव करीत संपूर्ण गावातून रॅली काढण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी सरपंच राजेश इंगोले, चंद्रकांत दळवी, डॉ. खिल्लारे, प्राचार्य बबनराव कदम, उपसरपंच वामनराव दळवी, बाबुराव शेवाळकर, कैलास बारे , डॉ प्रभाकर दळवी, सुरेश इंगोले, आलोक इंगोले, मंगेश दळवी, गजानन इंगोले, दिलिप सोनटक्के यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Web Title: Kurunda villagers took out 100 feet tricolor rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.