सालगड्याचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकला; दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: October 8, 2022 06:48 PM2022-10-08T18:48:09+5:302022-10-08T18:48:30+5:30

याबाबत सालगड्याचे वडिल रामजी गायकवाड हे विचारण्यासाठी गेले असता एकाने त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

labor was killed and the body was thrown into the riverbed; A case was filed two months later | सालगड्याचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकला; दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल

सालगड्याचा खून करून मृतदेह नदीपात्रात फेकला; दोन महिन्यानंतर गुन्हा दाखल

Next

हिंगोली : पैसे देण्याच्या कारणावरून सालगड्याचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून दोन महिन्यानंतर तिघांविरूद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना महादेव वाडी शिवारात ४ ऑगस्ट रोजी उघडकीस आली.

बालाजी रामजी गायकवाड ( वय ३५ रा. बेलवाडी ता. हिंगोली) असे मयताचे नाव आहे. बालाजी गायकवाड हे गावातील जनार्दन कडूजी मांडगे व काशिराम जयवंता मांडगे यांच्या शेतात सालगडी म्हणून कामास होते. एक वर्षापासून काम केलेले पैसे देण्याच्या कारणावरून दोघांनी बालाजी यांना हळद विकण्यासाठी हिंगोली येथे घेऊन आले. त्यानंतर जनार्दन मांडगे, काशिराम मांडगे व वसंता अभाना शिखरे यांनी बालाजी यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर प्रेत नदीच्या पात्रात फेकून दिले.

याबाबत बालाजी यांचे वडिल रामजी गायकवाड हे विचारण्यासाठी गेले असता एकाने त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात रामजी सखाराम गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जनार्दन कडूजी मांडगे, काशिराम जयवंता मांडगे, वसंता अभाना शिखरे (सर्व रा. बेलवाडी) याचेविरूद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात उशिरा ७ ऑक्टोबर रोजी रात्री गुन्हा नोंद झाला. सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख तपास करीत आहेत.

Web Title: labor was killed and the body was thrown into the riverbed; A case was filed two months later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.