सिरसम आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:22 AM2021-06-06T04:22:41+5:302021-06-06T04:22:41+5:30
हिंगोली : तालुक्यातील सिरसम प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव असून, कर्मचारीही वेळेवर हजर राहत नसल्याचा आरोप करीत याकडे लक्ष ...
हिंगोली : तालुक्यातील सिरसम प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव असून, कर्मचारीही वेळेवर हजर राहत नसल्याचा आरोप करीत याकडे लक्ष देण्याची मागणी डिग्रसवाणी ग्रामपंचायतीच्या सरपंच डॉ. चित्रा अनिल कुऱ्हे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी सिरसम आरोग्य केंद्रास भेट दिली असता, या ठिकाणी प्रसूती वाॅर्डामध्ये सुविधांचा अभाव दिसून आला. तसेच केवळ ४ कर्मचारी उपस्थित होते. औषधींचे वाटप कोणीही करू लागले. व्हरांडा, कार्यालय यासह सर्व वॉर्डामध्ये अस्वच्छता दिसून आली. कर्मचारीही वेळेवर येत नसल्याचे दिसून आले असून, पाण्याची कोणतीही सुविधा आढळली नाही. डिग्रसवाणी येथील उपकेंद्रातही सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे रुगांना खासगी रुग्णालयांत जावे लागत आहे, असा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे. याकडे लक्ष देऊन रुग्णांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी निवेदनात केली आहे.