जिल्ह्यात ‘लेक शिकवा अभियान’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:14 AM2019-01-03T00:14:49+5:302019-01-03T00:15:16+5:30
मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, मुली शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहाव्यात यासाठी ३ जानेवारीपासून जिल्ह्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ‘लेक शिकवा अभियान’ राबविले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, मुली शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहाव्यात यासाठी ३ जानेवारीपासून जिल्ह्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ‘लेक शिकवा अभियान’ राबविले जाणार आहे. ३ ते २६ जानेवारी दरम्यान प्राथमिक व माध्यमिक शाळेत हा उपक्रम राबवून सदर अहवाल मुख्याध्यापकांनी संबधित तालुक्याच्या गशिअमार्फत ३० जानेवारीपर्यंत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्थेकडे सादर करण्याच्या सूचना आहेत.
शाळेतील मुलींची गळती थांबावी यासाठी शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. परंतु जिल्ह्यात शाळेतील मुलींच्या गळतीचे प्रमाण वाढत आहे. मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे हे शिक्षण विभागासमोर आव्हान आहे. शिवाय शासनाच्या सूचनेनुसार शाळेतील मुलींची संख्या कमी होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु सदर योजनेची अंमलबजावणी प्रभाविपणे होणे तितकेच गरजेचे आहे. त्या अनुषंगाने लेक शिकवा अभियानच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. विशेष म्हणजे मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहित करणे, त्यांच्या शिक्षणाला गती मिळावी, प्रतिष्ठा आणि गुणात्मक दजार्चे अधिष्ठान लाभावे, परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये, मुलींमध्ये वैचारिक व तार्किक क्षमता निर्माण करून, गळती कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा अभियान राबविले जाणार आहे. हे अभियान ३ ते २६ जानेवारी या कालावधीत राबविण्याच्या सूचना राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक जिल्हा परिषद शाळा, शैक्षणिक संस्थांना विद्या प्राधिकरणाने दिल्या आहेत. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात लेक शिकवा अभियान प्रभावीपणे राबविण्या संदर्भात परित्रपकाद्वारे डायटचे प्राचार्य गणेश शिंदे यांनी सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे मुख्याध्यापकांनी संबधित तालुक्याच्या गशिअमार्फत ३० जानेवारीपर्यंत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास संस्थेकडे सादर करण्याच्या सूचना आहेत.
३ जानेवारीपासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान हा उपक्रम संपूर्ण जिल्हाभरात राबविण्यात येणार असून त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातर्फे देण्यात आली आहे. हा उपक्रम ३ ते २६ जानेवारी दरम्यान राबविण्यात येणार आहे. याबाबत संबधित तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना नुकतेच परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. जिल्हाभरात या उपक्रमाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेऊन तसा पाठविणे गरजेचे आहे.