लालपरी असुरक्षित: अर्धी अग्निशामक यंत्रे गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:27 AM2021-02-20T05:27:14+5:302021-02-20T05:27:14+5:30
प्रथमोचार पेट्याही गायब हिंगोली आगारातील बसेसना प्रथमोचार पेट्यांचे वावडे दिसत आहे. जेवढ्या बसेसची प्रत्यक्ष तपासणी केली, त्यापैकी कुणाकडेही या ...
प्रथमोचार पेट्याही गायब
हिंगोली आगारातील बसेसना प्रथमोचार पेट्यांचे वावडे दिसत आहे. जेवढ्या बसेसची प्रत्यक्ष तपासणी केली, त्यापैकी कुणाकडेही या पेट्या नव्हत्या. त्यात काहींनी मिळाल्या होत्या, असे सांगितले. तर काहींनी किटच न मिळाल्याने कुठून आणणार, असा सवाल केला. हाही तेवढाच गंभीर प्रश्न आहे.
आगाराच्या द्वारावर रक्षक
आगाराच्या द्वारावर रक्षक तैनात असल्याचे पाहायला मिळाला. नियमित कर्मचाऱ्यांशिवाय इतर कुणी आत जात असल्यास त्याला हा रक्षक हटकत कामाबाबत विचारणा करीत असल्याचे दिसून आले. केवळ ओळखीचा दिसला तरच मुक्त प्रवेश दिसत होता.
स्थानकात स्मोकिंग झोनच
बसस्थानकात विविध ठिकाणाहून आलेल्या प्रवाशांपैकी काही जण स्मोकिंग करतानाही दिसत होते. कुणी स्थानकाच्या कोपऱ्यावर तर कुणी आवारात हवेत धूर उडविताना दिसत होते. आगीच्या पार्श्वभूमीवर याला कोणी पायबंद घालायचा?
यंत्रे व किट दिल्या
हिंगोली आगारातील सर्व बसेसला अग्निशामक यंत्रे दिली. ज्यांची एक्स्पायरी आली. ती दरवर्षी बदलली जातात. वाहकांना त्यांच्या पेटीसोबतच प्राथमिक उपचार किटही दिली जाते. जर ती दिली नाही, असे सांगत असतील तर त्या वाहकांचा हा दोष आहे.
संजयकुमार पुंडगे, स्थानकप्रमुख, हिंगोली