लसीसाठी मोठी सुई; वेस्टेजमुळे पळता भुई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:34 AM2021-09-14T04:34:43+5:302021-09-14T04:34:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : कोरोना महामारीच्या काळात लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून ‘एडी’ सिरींजचा पुरवठा कमी झाला होता. त्यामुळे ...

Large needle for vaccine; Run away from the waste! | लसीसाठी मोठी सुई; वेस्टेजमुळे पळता भुई !

लसीसाठी मोठी सुई; वेस्टेजमुळे पळता भुई !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

हिंगोली : कोरोना महामारीच्या काळात लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून ‘एडी’ सिरींजचा पुरवठा कमी झाला होता. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. बालकांच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणारी २ सीसी सिरींज सध्या वापरण्यात येत आहे. त्यामुळे वेस्टेज काहीअंशी वाढल्याचे सद्यस्थितीत पाहायला मिळत आहे.

आजमितीस जिल्ह्यात कोरोना लसीकरण व बालकांचे लसीकरण नियमित सुरु आहे. नागरिकांना लसीकरणावेळी त्रास होईल, अशाप्रकारची सिरींज न पाठवता चांगल्या व नाजूक प्रकारची सिरींज शासनाने उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. ज्यामुळे लसीकरणावेळी नागरिकांना त्रास होणार नाही. बहुतांशवेळा लसीकरणस्थळी मोठी सुई पाहिली की नागरिक घाबरुन जातात. ‘नको रे बाबा लसीकरण’ म्हणून काहीजण निघून जातात. पण खरे पाहिले तर नागरिकांनी घाबरुन न जाता लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहनही आरोग्य विभागाने नागरिकांना केले आहे.

काय आहे ‘एडी’ सिरींज?

‘एडी’ ही अशी सिरींज आहे की, जी एकदाच वापरली जाते. ज्यामध्ये ऑटो डिजेबल असते. विशेष म्हणजे ही ‘एडी’ सिरींज परत वापरताही येत नाही.

२ सीसी सिरींज कशी असते?

दोन सीसी सिरींज ही दोन एम. एल.ची असते. जी सर्वसामान्य इंजेक्शनमध्येही वापरली जाते. विशेष म्हणजे इंजेक्शन देतेवेळी डॉक्टर समोरच्या व्यक्तीची पुरेपूर काळजी घेतात.

१० हजार सिरींज लागतात रोज जिल्ह्याला...

सद्यस्थितीत बालकांचे आणि कोरोना महामारीचे लसीकरण सुरु आहे. त्यामुळे रोज जवळपास १० हजार सिरींज जिल्ह्याला लागतात. इंजेक्शन दिल्यावर काही त्रास होत आहे का, याची विचारणा डॉक्टर करतात. इंजेक्शन दिल्यानंतर त्या व्यक्तीने थोडा वेळ जागेवरच विश्रांती घ्यावी, असेही आरोग्य विभागाने सांगितले.

वेस्टेजचे प्रमाण वाढले आहे...

मध्यंतरी शासनाकडून आलेल्या सिरींज या तकलादू आल्या आहेत. विशेष म्हणजे त्या निकृष्ट म्हणायला काही हरकत नाही. शासनाने सिरींज पाठवताना काळजी घेणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया...

मधल्या काळामध्ये कमी दर्जाच्या सिरींज उपलब्ध झाल्या होत्या. त्यामुळे स्थानिक स्तरावर पर्यायी व्यवस्था करुन लसीकरण करुन घेतले. सद्यस्थितीत ज्या नागरिकांनी लसीकरण केले नाही, त्यांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.

- डॉ. सचिन भायेकर, जिल्हा लसीकरण अधिकारी, हिंगोली

Web Title: Large needle for vaccine; Run away from the waste!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.