रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:30 AM2021-01-20T04:30:30+5:302021-01-20T04:30:30+5:30

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले की, वाहतूक उद्यान निर्मिती करण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश दिले. जेणेकरून वाहतूक उद्यानामुळे ...

Launch of road safety campaign | रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात

रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात

Next

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले की, वाहतूक उद्यान निर्मिती करण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्देश दिले. जेणेकरून वाहतूक उद्यानामुळे मुलांमध्ये लहानपणापासूनच वाहतुकीच्या नियमांची जनजागृती होण्यास मदत होईल. तसेच यावेळी त्यांनी सर्व नागरिकांनी जबाबदार नागरिक म्हणून वाहतुकीच्या नियमांचे पालन करून आपल्या आणि इतरांच्या प्राणांचे संरक्षण करावे, असे आवाहनही केले.

पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी ‘सडक सुरक्षा जीवन रक्षा’ या शासनाने दिलेल्या ब्रीदवाक्याबाबत माहिती दिली. हे अभियान १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणार असून, या कालावधीत विविध उपक्रम राबवित जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील नवीन रस्त्याचा वापर करताना अपघाताचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सर्व जनतेने वाहनाच्या गतीवर नियंत्रण ठेवावे व वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ओंकार चिंचोलकर, मोटार वाहन निरीक्षक सुदेश कंदकुर्तीकर, श्रीमती नलिनी काळपांडे व शैलेशकुमार कोपुल्ला तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न केले. फाेटाे नं. १०

Web Title: Launch of road safety campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.