उन्हामुळे कार्यकर्ते सोडा, मतदारही भेटेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:31 PM2019-04-03T23:31:10+5:302019-04-03T23:31:30+5:30

लोकसभा मतदारसंघात तब्बल १७00 गावे फिरण्यासाठी उमेदवारांना वेळ अपुरा पडणार असल्याने कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. मिळेल त्या वाहनाने जाऊन कार्यकर्ते प्रचार करीत असले तरीही उन्हामुळे मात्र बेजार झाले आहेत.

 Leave the activists for the summer, voters come in | उन्हामुळे कार्यकर्ते सोडा, मतदारही भेटेनात

उन्हामुळे कार्यकर्ते सोडा, मतदारही भेटेनात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : लोकसभा मतदारसंघात तब्बल १७00 गावे फिरण्यासाठी उमेदवारांना वेळ अपुरा पडणार असल्याने कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. मिळेल त्या वाहनाने जाऊन कार्यकर्ते प्रचार करीत असले तरीही उन्हामुळे मात्र बेजार झाले आहेत.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील सर्व तिन्ही विधानसभा, नांदेड जिल्ह्यातील हदगाव व किनवट विधानसभा तर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा येते. यात प्रत्येक ठिकाणी वेगवेळ्या राज्यस्तयीर राजकीय नेत्यांची छाप असलेला हा भाग आहे. त्यातही प्रत्येक भागात वेगळ्या प्रभावी नेत्यांचीही कमी नाही. त्यामुळे अशा ‘प्रभावीं’ना वरून व त्यांचा कार्यकर्त्यांना केवळ संदेश मिळाला की, खाली आपोआप काम होते. मात्र यावेळी जरा चित्र वेगळे आहे. असे नेमके कोणते संदेश जातील, याची उमेदवारांनाही भीती आहे. एकतर सेनेने नवा चेहरा दिला. तर सेनेचा जुना चेहरा काँग्रेसकडून आल्याने तेही काँग्रेससाठी नवीनच आहेत. या नवागतांसमोर कार्यकर्ते जुनेच असूनही नवीन असल्यासारखे वाटत आहेत. त्यामुळे प्रचारयंत्रणा कामाला लावायलाच विलंब झाला. त्यात आता उन्हाचा पारा ४१ अंशांच्याही पुढे सरकत आहे. मागील काही दिवसांपासून हेच चित्र आहे. दुपारी शहरी व ग्रामीण भागातही रस्ते निर्जन होत आहेत. शेतशिवारात काम करणारे तेथेच झाडाखाली डुलकी देत असल्याने उमेदवारांना गावातही कोणी भेटत नाही. सकाळी व सायंकाळीच प्रचारावर भर द्यावा लागत आहे. दुपारच्या वेळी तंबूत अथवा मोठ्या हॉलमध्ये मेळावे होत आहेत. मात्र हे प्रमाण अतिशय कमी आहे.
मागील काही दिवसांनंतर आता उमेदवार मैदानात आल्याचे दिसू लागले आहे. ग्रामीण भागात त्यांच्या सभा, बैठका होत आहेत. काँग्रेस उमेदवार सुभाष वानखेडे यांनी आधी आपल्याच भागात प्रचार चालविला होता. आता हिंगोली जिल्हा प्रवेश केल्याचे दिसते. दुसरीकडे शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी मात्र दोन्हींकडे एकाच वेळी प्रचारयंत्रणा राबवित पत्नी राजश्री पाटील यांची त्यांनी मदत घेतली आहे.
बसपाचे डॉ.दत्ता धनवे यांचीही अजून आपल्याच भागात प्रचारयंत्रणा दिसते. वंचित आघाडीचे मोहन राठोड मात्र आता किनवटबाहेर निघाले. हिंगोलीतही त्यांची प्रचारयंत्रणा दिसू लागली. एक-दोन अपक्ष वगळता इतर मात्र नुसते नावालाच अर्ज भरून घरी बसले की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अपक्षांना एवढी मोठी प्रचारयंत्रणा उभारणे, कार्यकर्ते जमा करणे अवघडच असते. एकीकडे पक्षीय व प्रमुख पक्षीय उमेदवारांना कार्यकर्ते जुळविणे व कामाला लावणे अवघड असताना अपक्षांना ते जमेल की नाही, हा प्रश्न आहे. दुसरे म्हणजे काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्याशी नामसाधर्म्याचेच आणखी पाच उमेदवार आहेत. अशांमुळे अर्जांची संख्या तेवढी वाढल्याचे दिसते.
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा कल कळण्याइतका मेळ लागणे जरा अवघडच जाते. कारण तीन जिल्ह्यात असलेल्या विस्तारात प्रत्येक तालुक्यातील ८0 ते १८0 गावे अन् प्रत्येक भागाची वेगळी स्थिती हे प्रमुख कारण आहे. ११ तालुक्यांत फिरणेच उमेदवारांना दमछाक करणारे असते. त्यातही सूर्याने डोळे वटारल्याने तर प्रमुख कार्यकर्त्यांपर्यंतही जाणे अवघड होत आहे. निवडणुकीच्या खर्चात बसत करण्यासाठी काही उमेदवार गाड्या-घोड्यांची व्यवस्थाही करीत नसल्याचे दिसते. कार्यकर्त्यांनाच तालुक्याला बोलावले जात आहे.
तापमानाचा पारा आता ४0 अंशांवरून ४१च्या पुढे सरकत आहे. दोन दिवस रात्रीला ढगाळ वातावरण होते. मात्र दिवसा कडक उन्हाचा तडाखा आहे. १८ तारखेपर्यंत तापमानात वाढीचाच अंदाज हवामान खात्याचा आहे.
उन्हामुळे कार्यकर्ते जमत नसल्यामुळे की, अन्य कारणाने यावेळी गर्दीवर कुणाचाच भर दिसत नाही. गर्दी जमली की सीट लागली हे समीकरणच यावेळी दिसत नाही. तर गर्दी न जमविताच विजयाचा मार्ग शोधण्याचा दुसराही फंडा असू शकतो. यावेळी उघड हालचालींपेक्षा पडद्यामागेच राजकारण घडत असल्याचे दिसत आहे. शिवाय दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षात न घेता कामाला लावण्याकडेच उमेदवारांचा कल दिसत आहे.

Web Title:  Leave the activists for the summer, voters come in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.