जड-अवजड वाहनांसाठी डावी मार्गिका निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:50 AM2019-08-28T00:50:38+5:302019-08-28T00:50:56+5:30
राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रामधील सर्व महामार्गावर जड व अवजड वाहनांची वाहतूक प्रत्येक मार्गाच्या डाव्या मार्गिकेमधून मार्गक्रमण करण्यासाठी निबंर्धाबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रामधील सर्व महामार्गावर जड व अवजड वाहनांची वाहतूक प्रत्येक मार्गाच्या डाव्या मार्गिकेमधून मार्गक्रमण करण्यासाठी निबंर्धाबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
राज्यातील ज्या महामार्गावर (राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, महानगरपालिका अथवा नगरपालिका क्षेत्रा अंतर्गत रस्ते) येण्या जाण्याच्या दोन्ही मार्गावर दोन मार्गिका आहेत. अशा सर्व महामार्गावर व रस्त्यांवर जड, अवजड वाहनांनी मार्गक्रमण करण्यासाठी प्रत्येक मार्गाच्या डावीकडील मार्गिका निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक मार्गाच्या उजवीकडील मार्गिकेमधून सतत मार्गक्रमण करण्यास मनाई करण्यात येणार आहे. प्रत्येक मार्गाच्या वाहतुकीची परिस्थिती पाहून उजव्या मार्गिकेतून ओव्हरटेक करता येईल, अपवादात्मक परिस्थितीमध्ये व ओव्हरटेक करण्यासाठी उजवीकडील मार्गिकेमध्ये आल्यावर सदर मार्गिकेमधून सतत मार्गक्रमण करण्यास मनाई करण्यात येणार आहे.
ज्या रत्यांवर येण्या-जाण्याच्या दोन्ही मार्गावर दोनपेक्षा अधिक मार्गिका आहेत, अशा सर्व मार्गावर जड व अवजड वाहनांनी मार्गक्रमण करण्यासाठी प्रत्येक मार्गाच्या सर्वात डावीकडील मार्गिका निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक मार्गाच्या सर्वात उजवीकडील मार्गिकेमधून दुभाजकाच्या बाजूची पहिली मार्गिका मार्गक्रमण करण्यास मनाई करण्यात येणार आहे.