कांडली शिवारात पुन्हा आढळला बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:39 AM2020-12-30T04:39:53+5:302020-12-30T04:39:53+5:30
शेतकरी भयभीत ; वनविभागाच्या पथकांने परिसर काढला पिंजून आखाडा बाळापूर : कांडली शिवारात पुन्हा एकदा मंगळवारी बिबट्याचे दर्शन झाले. ...
शेतकरी भयभीत ; वनविभागाच्या पथकांने परिसर काढला पिंजून
आखाडा बाळापूर : कांडली शिवारात पुन्हा एकदा मंगळवारी बिबट्याचे दर्शन झाले. पुन्हा त्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाले.कांडली शिवारात २९ डिसेंबर राेजी सकाळी देविदास नरवाडे याच्या शेतात बिबट्या आढळुन आला. त्यांनी राहुल पतंगे यांना माहिती दिली. त्यांनी वनविभागाला कळविले त्यानंतर वनपरिमंडळ अधिकारी प्रीया साळवे यानी भेट दिली. ग्रामस्थ व वनविभागाचे पथकांनी सर्व परीसर पिजुन काढला. यादरम्यान सोपानराव देशमुख यांच्या शेतात पाण्याच्या आसऱ्याने विहीर परीसरात पायाचे ठसे ऊमटलेले दिसले. परिसरातील शेतकरी रात्री अपरात्री पाणी देण्यास जाणाऱ्या शेतकऱ्यांत भितीचे वातावरण तयार झाले आहेत. यापूर्वीही कांडली शिवारात बिबट्या कॅमेरा बंद झाला होता. पुन्हा एकदा त्याचा वावर परिसरात आढळल्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.