कुष्ठरोग, क्षयरुग्ण शोधमोहिमेत तालुक्यात ६९ रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:24 AM2021-01-15T04:24:46+5:302021-01-15T04:24:46+5:30

तालुक्यात २ लाख ७ हजार ७१६ नागरिकांची शोधमोहिमेअंतर्गत स्क्रीनिंग करण्यात आली. गावांतील आशावर्करमार्फतही शोधमोहीम राबविण्यात आली. ...

A leprosy and tuberculosis search operation found 69 patients in the taluka | कुष्ठरोग, क्षयरुग्ण शोधमोहिमेत तालुक्यात ६९ रुग्ण आढळले

कुष्ठरोग, क्षयरुग्ण शोधमोहिमेत तालुक्यात ६९ रुग्ण आढळले

Next

तालुक्यात २ लाख ७ हजार ७१६ नागरिकांची शोधमोहिमेअंतर्गत स्क्रीनिंग करण्यात आली. गावांतील आशावर्करमार्फतही शोधमोहीम राबविण्यात आली. या शोधमोहिमेंतर्गत क्षयरोगाचे ८७४ जण संशयित आढळून आले. त्यापैकी ७४६ जणांची थुंकी तपासणी करण्यात आली. त्यात नऊजण व ५६७ संशयिताचे एक्स-रे काढण्यात आले. त्यात ३९ जण व अंगावर गाठी आलेले ४ जण असे एकूण ५२ रुग्ण क्षयरोगाचे आढळून आले आहेत. तालुक्‍यात कुष्ठरोगाचे ५७६ जण संशयित आढळून आले. तपासणीनंतर त्यापैकी १७ जण कुष्ठरोगी आढळून आले आहेत. या कुष्ठरोगी व क्षयरुग्णांना आरोग्य विभागांमार्फत मोफत औषधोपचार केला जाणार आहे. निश्चय पोषण योजनेअंतर्गत ५०० रुपये असे एकूण सहा महिने तीन हजार रुपये या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला दिले जातात. तसेच त्यांची आवश्यक पडताळणी, चाचणीही विनामूल्य केल्या जाते. आशावर्करनी घरोघरी जाऊन डिसेंबर महिन्यात हे अभियान राबविले. सर्व संशयितांची कुष्ठराेग व क्षयरोग या आजारातबाबत शारीरिक तपासणी व लक्षणानुसार थुंकी नमुने व क्ष-किरण तपासणी करण्यात आली. त्वचेवर फिकट लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे, जाड, बधीर तेलकट चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधिरपणा अथवा जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून व पाय घोट्यापासून लुळा पडणे, त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे, हात व पायामध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातून वस्तू गळून पडणे ही कुष्ठरोगाची लक्षणे आहेत. तसेच दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला व जास्त ताप, वजनात लक्षणीय घट थुंकीवाटे रक्त येणे, मानेवरील गाठही क्षयरोगाची लक्षणे आहेत, अशी माहिती वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आकाश चव्हाण, आकाश मुळे यांनी दिली.

Web Title: A leprosy and tuberculosis search operation found 69 patients in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.