पोलीस काका-दीदींना द्या निर्भयपणे माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:46 PM2017-12-16T23:46:15+5:302017-12-16T23:46:22+5:30

शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणारा त्रास तसेच त्यांना माहित पडणाºया कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत आता पोलीस काका व दीदी याकडे विशेष लक्ष देणार आहेत. पोलिसांविषयी असलेली भीती दूर व्हावी व शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी निर्भयपणे राहावे यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या संकल्पनेतून हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला.

Let the police go to the uncle and fearlessly | पोलीस काका-दीदींना द्या निर्भयपणे माहिती

पोलीस काका-दीदींना द्या निर्भयपणे माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देहिंगोली जिल्हा पोलीस : विद्यार्थ्यांनी ब्ल्युव्हेल, लुडो, तीनपत्ती खेळापासून दूर राहण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणारा त्रास तसेच त्यांना माहित पडणाºया कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत आता पोलीस काका व दीदी याकडे विशेष लक्ष देणार आहेत. पोलिसांविषयी असलेली भीती दूर व्हावी व शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी निर्भयपणे राहावे यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या संकल्पनेतून हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला.
पोलीस दलातर्फे सुरू करण्यात आलेल्या नवीन उपक्रमासाठी पथक नेमण्यात आले आहे. पथकद्वारे विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना माहिती दिली जात आहे. शालेय विद्यार्थ्यांनी इंटनेटचा वापर टाळावा तसेच ब्ल्युव्हेल, लुडो, तीनपत्ती खेळांपासून दूर राहावे, तसेच घरबसल्या आॅनलाईन तक्रार कशाप्रकारे करावी यासह पोलीस प्रशासनातील कामकाजा संदर्भात माहिती देण्यात आली. पोलीस काका म्हणून शेख शकील तर पोलीस दीदी म्हणून मीरा बामणीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस काका व दीदीचा मोबाईल क्रमांक देण्यात आला. कुठल्याही क्षणी दुरध्वनीवरून संपर्क केल्यास पोलीस ताबडतोब मदतीला धावून येतील, त्यामुळे निर्भयपणे परिसरात घडणाºया गुन्ह्यांच्या घटनांची माहिती पोलिसांना देण्याचे यावेळी आवाहन पथकातील अधिकारी कर्मचाºयांनी केले. हिंगोली शहरातील सरजुदेवी विद्यालय, भारतीय विद्यामंदिर, उर्दू हायस्कूल यासह अनेक शाळांच्या भेटी घेऊन विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
अनुचित घटनेबद्दल तत्काळ माहिती सांगा- गोमासे
शालेय परिसरात किंवा इतरत्र एखादा अनुचित प्रकार घडत असेल, किंवा विद्यार्थिनींची कोणी छेडछाड काढत असेल तर निर्भयपणे या घटनेबाबत पोलिसांना माहिती द्यावी. तसेच प्रत्येक शाळांच्या भेटी घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याचे हिंगोली शहर ठाण्याचे पोउपनि प्रेमलता गोमासे यांनी सांगितले.

Web Title: Let the police go to the uncle and fearlessly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.