बसस्थानकातील रखडलेली कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करू-परिवहनमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:32 AM2021-09-18T04:32:23+5:302021-09-18T04:32:23+5:30

येथील बसस्थानकाचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ऑनलाईन उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ...

Let's complete the stalled work at the bus stand in phases - Transport Minister | बसस्थानकातील रखडलेली कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करू-परिवहनमंत्री

बसस्थानकातील रखडलेली कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करू-परिवहनमंत्री

Next

येथील बसस्थानकाचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ऑनलाईन उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार चंद्रकांत नवघरे, माजी आमदार रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, परभणी विभागाचे विभाग नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांची उपस्थिती होती.

परब म्हणाले, कोरोना महामारीमुळे सन २०१८ पासून हिंगोली बसस्थानकाचे उद्घाटन लांबले होते. हे बसस्थानक जनतेच्या सोयीसाठी खुले करून देण्यात येत असल्याचे सांगितले. या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची वृत्ती सतत बजावत राहू, अशी ग्वाही देऊन कोरोना महामारीमुळे महामंडळाची परिस्थिती चांगली नसली तरीसुद्धा या बसस्थानकातील राहिलेली उर्वरित छोटी-छोटी कामे टप्प्याटप्प्याने लवकरच पूर्ण करण्यात येतील. तसेच आपण दिलेल्या सूचना आचरणात आणण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री गायकवाड म्हणाल्या, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या या सुवर्णक्षणी हिंगोली बसस्थानकाचे उद्घाटन झाले. उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्याच्या सूचना यांनी यावेळी केल्या.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेले वाहतूक नियंत्रक शेख सलिमोद्दीन व वाहतूक नियंत्रक केशव गोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेची मंडळी पुन्हा गैरहजर

हिंगोलीत महाविकास आघाडीतील शिवसेना हा घटक पक्ष पालकमंत्र्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मात्र हजर दिसत नाही. एक खासदार, एक आमदार असतानाही ते येत नाहीत. आज सेनेचेच मंत्रीही ऑनलाईन हजर असतानाही कोणी या कार्यक्रमाकडे फिरकले नाही. त्यामुळे का रे हा दुरावा... ची चर्चा रंगली होती.

Web Title: Let's complete the stalled work at the bus stand in phases - Transport Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.