ग्रंथालय संघाचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:29 AM2019-02-21T00:29:57+5:302019-02-21T00:30:21+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्हाभरातील ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्हाभरातील ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.
या कर्मचाºयांनी काम बंद ठेवून या आंदोलनात सहभाग घेतला होता. याबाबत जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाºयांना २0१२ मधील बाकी असलेली ५0 टक्के परिरक्षण अनुदान वाढ धरून किमान तिप्पट अनुदानवाढ द्यावी, सार्वजनिक परिरक्षण अनुदानात वाढ करताना आकृतीबंधानुसार शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाºयांसाठी वेतनश्रेणी, सेवा शर्ती सेवा नियम मंजूर करून लागू करावे, त्यानुसार वेतनश्रेणी निश्चित करावी, सर्व वर्गाच्या ग्रंथालय कर्मचाºयांच्या कामांचे तास शासकीय कामकाज नियमानुसार पूर्णवेळ किंवा अर्धवेळ करावे, ग्रंथालयांची नैसर्गिक वाढ होण्यासाठी २0१२ पासून बंद केलेले दर्जा व वर्गबदल, नवीन शासन मान्यता त्वरित सुरू करावी, राज्य ग्रंथालय परिषद व जिल्हा ग्रंथालय समित्यांची पुनर्रचना करावी आदी मागण्या केल्या आहेत. निवेदनावर अध्यक्ष खंडेराव सरनाईक, विलास वैद्य, गजानन शिंदे आदींची नावे आहेत. यावेळी जिल्हाभरातून मोठ्या संख्येन ग्रंथालय संघाचे पदाधिकारी व कर्मचारी आले होते.
उपोषण सुरू
हिंगोली नगरपालिकेतील श्रेणी ब लेखा व लेखापरिक्षण अधिकाºयाच्या समावेशनाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी हिंगोली न.प.चे कर्मचारी डी.पी.शिंदे हे उपोषणाला बसले आहेत. याबाबत त्यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाºयांकडेही तक्रारी केल्या आहेत.