लायसनची मुदत संपली, अपॉइंटमेंट घेतलीय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:20 AM2021-06-10T04:20:50+5:302021-06-10T04:20:50+5:30
दीड महिन्यानंतर कार्यालयातील कामकाज सुरळीत सुरू झाले आहे. सध्या जिल्हा दुसऱ्या लाटेत असून कोरोनाचे नियम व्यवस्थितरीत्या पाळले ...
दीड महिन्यानंतर कार्यालयातील कामकाज सुरळीत सुरू झाले आहे. सध्या जिल्हा दुसऱ्या लाटेत असून कोरोनाचे नियम व्यवस्थितरीत्या पाळले जात आहेत. शासनाने लायसन वाटपासाठी परवानगी दिली असली तरी, अजून तर गर्दी झालेली पाहायला मिळत नाही. उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर त्याची प्रत उपप्रादेशिक कार्यालयात आणून दाखवावी. यानंतर त्यास चाचणी घेऊन लायसन देण्यात येते, असे परिवहन कार्यालयाने सांगितले.
कोरोनाआधी शिकावू अनुज्ञप्ती चाचणी ८० तर पक्की अनुज्ञप्ती चाचणी १४० देण्यात येत होती. सध्या शिकावू अनुज्ञप्ती चाचणी ४० आणि पक्की अनुज्ञप्ती चाचणी ६० देण्यात येत आहे. कोरोना ओसरू लागला असला तरी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क हे बंधनकारक केले आहे.
दोन दिवसांमध्ये १०० झाली चाचणी
मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत कार्यालय बंद असले तरी कामकाज सुरू होते. तसेच ऑनलाइन प्रक्रियाही बंदच होती. ८ जून रोजी ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या दोन दिवसांमध्ये १०० वाहन उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. कोरोनाचे नियम पाळत नोंदणी केलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र दिले.