खाजगी कोविड सेंटरला १५ ऑक्सिजन बेडची मर्यादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:28 AM2021-05-15T04:28:30+5:302021-05-15T04:28:30+5:30
या सर्व पार्श्वभूमीवर खाजगी कोविड सेंटरला भेटी देवून प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोयीसुविधांची पाहणी केली. त्यात अनेक रुग्णालयांकडे अपेक्षित ...
या सर्व पार्श्वभूमीवर खाजगी कोविड सेंटरला भेटी देवून प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोयीसुविधांची पाहणी केली. त्यात अनेक रुग्णालयांकडे अपेक्षित संख्येत सिलिंडरची व्यवस्था नसतानाही त्यांनी जास्त खाटांची मान्यता घेतल्याचे दिसून आले. त्यात ऑक्सिजन सिलिंडर राखीव ठेवण्याचा व वाहतुकीसाठी तेवढेच सिलिंडर ठेवण्याचा या रुग्णालयांना विसर पडल्याचे दिसले. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्यामागे हेही एक मोठे कारण असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा रुग्णालयाकडून जिल्ह्यातील सर्व १२ कोविड सेंटरमध्ये १५ पेक्षा जास्त ऑक्सिजन बेड असता कामा नये, अशी शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
रुग्णसंख्याही घटलेलीच
सध्या एकूण रुग्णसंख्याच घटलेली आहे. त्यातही ऑक्सिजन बेडही कामी लागत आहेत. १४ मे रोजी जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटरमध्ये मिळून ७९ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यात काही रुग्णालयात तर एकही रुग्ण ऑक्सिजनवर नाही. किमान दोन तर कमाल १७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शिफारसीप्रमाणे आदेश काढल्यास जिल्ह्यात खाजगी रुग्णालयांत १८० ऑक्सिजन बेडच उरणार आहेत.