भाषिक संकोच अन् विरोध वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:16 AM2018-12-01T00:16:00+5:302018-12-01T00:16:43+5:30

ज्याची सत्ता त्याची भाषा, जनमानसात रुजविण्याची परंपरा भारतात पुर्वापार चालत आली. म्हणूनच मराठी भाषा देशाच्या ७५ टक्के भागात पोहोचली होती. परंतु भाषावार प्रांतरचनेनंतर भाषिक संकोच वाढला आणि त्याचे रुपांतर भाषिक विरोधात झाले. आता त्याने उग्ररुप धारण केले आहे. असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केले आहे.

 Linguistic suspicion and opposition increased | भाषिक संकोच अन् विरोध वाढला

भाषिक संकोच अन् विरोध वाढला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : ज्याची सत्ता त्याची भाषा, जनमानसात रुजविण्याची परंपरा भारतात पुर्वापार चालत आली. म्हणूनच मराठी भाषा देशाच्या ७५ टक्के भागात पोहोचली होती. परंतु भाषावार प्रांतरचनेनंतर भाषिक संकोच वाढला आणि त्याचे रुपांतर भाषिक विरोधात झाले. आता त्याने उग्ररुप धारण केले आहे. असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी केले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्यामार्फत येथील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम् येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंगोली ग्रंथोत्सव-२०१८’च्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून कौतिकराव ठाले पाटील बोलत होते. या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य तथा नियोजित मराठवाडा साहित्य समेल्लनांचे अध्यक्ष, समिक्षक प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे, जिल्हा ग्रंथालय संघ हिंगोलीचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, प्रा. विलास वैद्य, अशोक अधार्पुरकर, कुंडलिकराव अतकरे आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिलींद सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ठाले पाटील पुढे म्हणाले की, मातृभाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मराठवाड्यामध्ये निजामाचे सत्ता असल्यामुळे भाषिक मागासलेपण व शैक्षणिक मागासलेपण कायम राहिले. त्यामुळेच मराठवाड्यात वाचन संस्कृती म्हणावी त्या प्रमाणात रुजली नाही. हिंगोली जिल्ह्यात सांस्कृतिक वातावरण निर्मितीसाठी विशेष परिश्रम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले की, वाचनसंस्कृती वाढावी यासाठी शासनाने सुरु केलेला ग्रंथोत्सव हा उपक्रम स्तुत्य आहे. युवा पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करुन समाजात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व ती टिकून राहण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अतिशय महत्त्वाचे आहेत. प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, विलास वैद्य यांची समोयोचित भाषणे झाली. प्रास्ताविक सहाय्यक संचालक सुनील हुसे यांनी केले. प्रारंभी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित ग्रंथ विक्री व प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी साहित्यिक, वाचनप्रेमी, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन अश्विनी आसेगावकर यांनी केले. तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिलींद सोनकांबळे यांनी आभार मानले.
पुर्वीच्या शिक्षकांमध्ये परोपकाराचा संस्कार करण्याची मानसिकता होती. त्यांच्यात जात दडली नव्हती. परंतु सध्याचे सामाजिक पर्यावरण फार दूषित झाले आहे. आता नजरेतून जात दिसत नाही; परंतु वर्तनातून मात्र जात स्पष्ट दिसते. यावर एकच उतारा असून ग्रंथच माणसाच्या वर्तणुकीच्या उत्क्रांतीसाठी प्रेरक ठरू शकतात. माणुुसकीच्या वर्तनाचा, वागणुकीचा पुन्हा पुन्हा ग्रंथच विचार करायला लावतात. नव्या संवेदना व स्वाभिमानाच्या जाणिवा ग्रंथ देतात. त्यामुळे ग्रंथ माणुसकीसाठी वरदान ठरतात, असे उत्सव माणुसकीसाठी पुन्हा-पुन्हा भरले पाहिजेत.
हिंगोली ग्रंथोत्सवाची सुरुवात सकाळी ग्रंथ दिंडीने झाली. अप्पर जिल्हाधिकरी जगदिश मिनियार यांच्या हस्ते ग्रंथ दिंडी शुभारंभ झाला. जि.प.बहुविध प्रशाला ते कल्याण मंडपम्पर्यंत दिंडी काढली. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या ग्रंथ दिंडीमध्ये सहभाग घेतला होता.

Web Title:  Linguistic suspicion and opposition increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.