औंढ्यातील दारू दुकानांची १८ रोजी सुनावनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:32 AM2018-12-12T00:32:24+5:302018-12-12T00:32:47+5:30
औंढा नागनाथ येथे नागरि वस्तीत होवू घातलेल्या देशी दारूच्या दुकानाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे असलेली सुनावनी न झाल्याने चारशे ते पाचशे जणांचा जमाव संतप्त झाला होता. मात्र १८ रोजी याची सुनावनी करण्यात येईल, असे सांगण्यात आल्याने जमाव माघारी फिरला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : औंढा नागनाथ येथे नागरि वस्तीत होवू घातलेल्या देशी दारूच्या दुकानाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे असलेली सुनावनी न झाल्याने चारशे ते पाचशे जणांचा जमाव संतप्त झाला होता. मात्र १८ रोजी याची सुनावनी करण्यात येईल, असे सांगण्यात आल्याने जमाव माघारी फिरला.
औंढा नागनाथ येथे बालाजी नगर भाग हा नागरी वस्ती असताना या भागात नवीन देशी दारूच्या दुकानाचा प्रस्ताव मंजूर करण्यात येत असल्याने त्याला या भागातील नागरिकांनी विरोध दर्शविला होता. यासाठी १७ आॅक्टोबर २0१८ रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते.
हे दुकान येथून स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर आज सुनावनी होणार होती. त्यासाठी जवळपास तीनशे ते चारशे महिला पुरुष जिल्हा कचेरीवर धडकले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ही मंडळी येथे आल्यावर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी येथे नसल्याचे कळाले. त्यांना अचानक मुंबईला बैठकीला जावे लागल्याने हा प्रकार घडला. मात्र याबाबत आम्हाला कळविले नसल्याने आमचा गोरगरिबांचा खर्च वाया गेल्याचा संताप सगळेजण व्यक्त करीत होते. दारूबंदी विभागाचे राऊत यांना कात्रित पकडण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र नंतर ही मंडळी निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांच्या दालनात आली. तेथे पुढील सुनावनीची तारीख १८ डिसेंबर देण्यात आली. त्यामुळे हा जमाव माघारी फिरला.