कृषी पायाभूत सुविधेतून मिळणर २ काेटीपर्यंत कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:19 AM2021-07-22T04:19:27+5:302021-07-22T04:19:27+5:30

हिंगोली : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत घोषित केलेल्या कृषी मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार ...

Loans up to Rs. 2 crore from agricultural infrastructure | कृषी पायाभूत सुविधेतून मिळणर २ काेटीपर्यंत कर्ज

कृषी पायाभूत सुविधेतून मिळणर २ काेटीपर्यंत कर्ज

Next

हिंगोली : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत घोषित केलेल्या कृषी मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत घोषित केलेल्या कृषी मूलभूत सुविधा अंतर्गत २ कोटी रुपयापर्यत कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या योजनेसाठी कर्जाचा कालावधी सात वर्ष असून वार्षिक व्याजदरावर ३ टक्के सूट देण्यात आली आहे. सदरील योजनेत कापनीनंतरच्या व्यवस्थापनासाचे प्रकल्प समाविष्ट केले आहेत. यात मार्केटींग प्लॅटफाॅर्म, गोदाम, पॅक हाऊस, मुरघास, संकलन केंद्र, वर्गवारी आणि प्रतवारी गृह, शीतगृह, पुरवठा सुविधा, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, रायनिंग चेंबर तसेच सामूहिक शेतीकरीता आवश्यक सेंद्रीय उत्पादने, जैविक निविष्ठा उत्पादन प्रकल्पाचा समावेश केला आहे.

वित्तपुरवठा कोण घेऊ शकते...

प्राथमिक कृषी पतसंस्था, विपणन सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयं सहायता गट, संयुक्त उत्तरदायीत्व गट, बहुउद्देशीय सहकारी संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स आणि केंद्र, राज्य संस्था किंवा स्थानिक संस्था पुरस्कृत सार्वजनिक खाजगी भागिदारी प्रकल्प.

सहभाग घेण्यासाठीची प्रक्रिया...

अर्जदाराने ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर त्यास अधिकारपत्र मिळेल, अर्जदार लाभार्थी कर्जासाठी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा, अर्जासोबत प्रकल्प अहवालाची मूळप्रत आणि प्रकल्प अहवालाशी संबंधित कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणे, कर्ज देणारी संस्था या प्रकल्पाचे मूल्यांकन करुन प्रकल्पाच्या व्यवहार्यतेनुसार कर्ज मंजूर करावे किंवा प्रकल्प नाकारणे याबाबत निर्णय घेईल,कर्ज मंजूर झाल्यानंतर निधी लाभार्थीच्या बँक खात्यात परस्पर जमा करण्यात येईल.

Web Title: Loans up to Rs. 2 crore from agricultural infrastructure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.