३०० एकरच्या वर परिसर खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:48 AM2018-03-04T00:48:40+5:302018-03-04T00:48:43+5:30

येथील पश्चिम दिशेला लागून असलेल्या खाजगी व वनविभागाच्या जंगलात वणवा पेटल्याने सुमारे ३०० एकरच्या वर परिसर जळून खाक झाला आहे. दिवसभर जळालेला हा वणवा रात्री उशिरा वनविभागाच्या वतीने प्रयत्न करून थांबविण्यात आला होता. त्यामुळे पुढील हाणी टाळली.

 Locate around 300 acres of land | ३०० एकरच्या वर परिसर खाक

३०० एकरच्या वर परिसर खाक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : येथील पश्चिम दिशेला लागून असलेल्या खाजगी व वनविभागाच्या जंगलात वणवा पेटल्याने सुमारे ३०० एकरच्या वर परिसर जळून खाक झाला आहे. दिवसभर जळालेला हा वणवा रात्री उशिरा वनविभागाच्या वतीने प्रयत्न करून थांबविण्यात आला होता. त्यामुळे पुढील हाणी टाळली.
औंढा नागनाथ येथे बसस्थानक, आश्रम शाळा, पेट्रोलपम्पचा पाठीमागे असलेल्या जंगलाला शुक्रवारी सकाळपासून आग लागली होती. अज्ञात व्यक्तीनं ही आग लावल्याची प्राथमिक माहिती आहे. दिवसभर सुरू असलेली ही आग शहराजवळ लागून असलेल्या माळाला लागल्याने माळांच्या पायथ्यापाशी रहाणाºया नागरिकांत घबराट निर्माण झाली होती. आगीत खाजगी माळ जळालेला आहे. शिवाय अनेक प्राणी व वनस्पतीही आगीत झळून गेल्या आहेत. शेवटी वन विभागाच्या अधिकाºयांनी व कर्मचाºयांनी एकत्रित येऊन ही आग आटोक्यात आणल्याने पुढील नुकसान टळले.

Web Title:  Locate around 300 acres of land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.