वसमत येथील वैकुंठधाम स्मशानभूमित अस्थीकलशासाठी ‘लॉकर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 11:42 PM2018-02-01T23:42:51+5:302018-02-02T11:05:05+5:30
येथील वैकुंठधाम स्मशान भुमीत दाहसंस्कार केल्यानंतर अस्थीकलश संकलनासाठी लॉकरची सुविधा उपलब्ध नव्हती ही अडचण पाहता स्मशानभुमीस लॉकर भेट देण्यात आली आहे. गुरूवारी मान्यवरांच्या उपस्थित लॉकर स्मशानभूमित बसवण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : येथील वैकुंठधाम स्मशान भुमीत दाहसंस्कार केल्यानंतर अस्थीकलश संकलनासाठी लॉकरची सुविधा उपलब्ध नव्हती ही अडचण पाहता स्मशानभुमीस लॉकर भेट देण्यात आली आहे. गुरूवारी मान्यवरांच्या उपस्थित लॉकर स्मशानभूमित बसवण्यात आले.
वैकुंठधाम स्मशानभूमित दाहसंस्कार झाल्यानंतर अस्थी संग्रहित करण्यासाठी आलेल्यांना अस्थी झाडाला बांधून ठेवाव्या लागत होत्या. ही गैरसोय दूर व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. वसमत न.प.चे सभापती सीताराम म्यानेवार यांनी लॉकर स्मशानभूमीला भेट दिले. सामाजिक जाणीवेतून केलेल्या या उपक्रमाचे स्वागत होत आहे. यापूर्वी अस्थी झाडाला बांधाव्या लागत होत्या. ही गैरसोय आता दूर झाली आहे. लॉकर समर्मित करण्याच्या कार्यक्रमास सभापती सीताराम म्यानेवार, गणेश काळे, शिवाजी अलडिंगे, भगवान कुदाळे, दिलीप भोसले, संजय भोसले, मन्मथ आप्पा बेले, तुळशीराम तोटवार, सचिन दगडू, विष्णू बोचकरी आदींची उपस्थिती होती.