हल्लाबोलमध्ये लॉकेट, पाकिटांवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:25 AM2018-01-23T00:25:07+5:302018-01-23T00:25:10+5:30
वसमत येथे आयोजित हल्लाबोल यात्रेनिमित्त झालेल्या सभेत चोरट्यांनी अनेकांच्या पाकीट, मोबाईलवर डल्ला मारला. हल्लाबोल सभा अनेकांना चांगलीच महागात पडली. १ लाख, १३ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : वसमत येथे आयोजित हल्लाबोल यात्रेनिमित्त झालेल्या सभेत चोरट्यांनी अनेकांच्या पाकीट, मोबाईलवर डल्ला मारला. हल्लाबोल सभा अनेकांना चांगलीच महागात पडली. १ लाख, १३ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.
वसमत येथे जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या सभेत पाकीटमारांनी चांगलाच डल्ला मारला. अनेकांची पाकीटे, मोबाईल व साहित्यावर डल्ला मारल्याच्या तक्रारी सभा संपल्यानंतर ऐकावयास मिळाल्या. यापैकी श्रीधर दगडू पारवे (रा.गौर ता.पूर्णा) यांचे १५ हजार रुपये असलेले पाकीट चोरीला गेल्याची तक्रार शहर पोलिसांत त्यांनी दिली आहे. याशिवाय हुंबाडे यांचे सोन्याचे लॉकेट व १३ हजार रु. किंमतीचा मोबाईल, बारामतीहून आलेल्या एका कार्यकर्त्याचे ३ हजार ८०० रुपये असा एकूण १ लाख १३ हजार रुपयांचा ऐवजाच्या चोरीची नोंद वसमत शहर पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे.
‘हल्लाबोल’ यात्रा यशस्वी होईल तेव्हा होईल मात्र हल्लाबोल साठी आलेल्यांवर चोरट्यांचा हल्लाबोल यशस्वी झाला आहे. दाखल तक्रारीशिवाय कित्येक जणांचे मोबाईल, पाकीट व ऐवज चोरीला गेल्याच्या तक्रारी ऐकावयास मिळाल्या. सभा संपल्यानंतर नेत्यांसोबत फोटो व सेल्फी काढण्यासाठी झालेल्या गर्दीतच चोरट्यांनी डल्ला मारण्याची संधी साधली.
गिरगावात चोरी; ४२ हजारांचा ऐवज लंपास
कुरूंदा : वसमत तालुक्यातील गिरगाव येथे दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी १५ हजार रुपये नगदी व २७ हजारांचे सोन्याचे दागिने असा एकूण ४२ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना २२ जानेवारीच्या मध्यरात्री २ ते ४ च्या दरम्यान घडली आहे. गिरगाव येथील फिर्यादी शिवाजी कºहाळे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी मेनगेट व बैठक रूमचे कडी कुलूप तोडले. त्यानंतर कपाटातील नगदी १५ हजार व २७ हजारांचे सोन्याचे दागिने असा एकूण ४२ हजारांचा माल लंपास केला. याप्रकरणी कुरूंदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.