प्रवासात हरवलेली चिमुकली आजोबांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:16 AM2018-02-21T01:16:09+5:302018-02-21T01:16:16+5:30

आजी-आजोबांसोबत प्रवासाला गेलेली पाच वर्षाची चिमुकली बसमध्ये बसली. आजी-आजोबा उतरले पण ती चुकून बसमध्येच राहिली. तिचा प्रवास सुरूच राहिला. गाडी चालली पण आजी-आजोबा दिसेनात त्यामुळे गलबललेली चिमुरडी रडायला लागली.

 The lost one is lost by the grandfather | प्रवासात हरवलेली चिमुकली आजोबांच्या स्वाधीन

प्रवासात हरवलेली चिमुकली आजोबांच्या स्वाधीन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : आजी-आजोबांसोबत प्रवासाला गेलेली पाच वर्षाची चिमुकली बसमध्ये बसली. आजी-आजोबा उतरले पण ती चुकून बसमध्येच राहिली. तिचा प्रवास सुरूच राहिला. गाडी चालली पण आजी-आजोबा दिसेनात त्यामुळे गलबललेली चिमुरडी रडायला लागली. प्रवाशांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने घाबरली. तिला नाव, पत्ता काहीच सांगता येईना. वाहकाने तिला बाळापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. फौजदार सविता बोधनकर यांनी तिला मायेने सांभाळले. दोन तासांनंतर तिच्या नातेवाईकांचा शोध घेऊन तिला त्यांच्या स्वाधीन केले.
हदगाव तालुक्यातील घोगरी येथील रहिवासी असलेले इरप्पा नागा रेपनवाड हे आपली पत्नी यल्लाबाई व पाच वर्षांची नात सुप्रिया यांना सोबत घेऊन नांदेडहून गावी घोगरीकडे निघाले. नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकातून ते औसा- अकोला या बस क्र.एमएच-२०-बी-२२५४ मध्ये बसले. वारंगा फाटा येथे बस बदलून हदगावकडे पकडण्यासाठी उतरले. बसमधून नातही उतरली असावी, असे त्यांना वाटले. इकडे बस चालू झाली. काही वेळानंतर आजी-आजोबा सोबत नाहीत, हे लक्षात येताच सुप्रिया रडायला लागली. प्रवाशांनी विचारपूस केली पण भांबावलेल्या सुप्रियाला काहीच बोलता येईना. अखेर चालक-वाहक, प्रवाशांनी सुप्रियाला बाळापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. तिला रडू आवरता येत नव्हते. फौजदार सविता बोधनकर यांनी तिला प्रेमाने आपलेसे केले. कुरकुरे, चॉकलेट खायला दिले. ठाण्यात उभारलेल्या गार्डनमध्ये झोक्यावर खेळविले. हरवलेल्या या लहान लेकरास खेळविताना ठाणेच जणू पाळणाघर झाले. दरम्यान, हिंगोली, लातूर, नांदेड सर्वत्र वायरलेसवर मॅसेज दिला. फेसबुक, व्हॉट्सअपवर संदेश दिला. वारंगा चौकीच्या पोलीस कर्मचाºयांना गस्त घालताना म्हातारी, म्हातारा नात हरवली म्हणून रडत बसल्याचे आढळले. त्यांची विचारपूस करून त्यांना मुलीचा फोटो दाखविला. ओळख पटल्यावर ठाण्यात आणले.
पो.नि. व्यंकट केंद्रे, पोउपनि सविता बोधनकर, पोना शेख बाबर, अर्शद खान यांनी सुप्रिया हिस आजी-आजोबांच्या सुपूर्द केले. बाळापूर ठाण्यात आॅपरेशन मुस्कान यशस्वी झाले.

Web Title:  The lost one is lost by the grandfather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.