रिंगण सोहळ्याला लोटली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:22 AM2018-07-05T00:22:01+5:302018-07-05T00:22:17+5:30

येथील रामलीला मैदानावर श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथील आद्यसंत श्री नामदेव महाराजांच्या पालखी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यंदाही पालखीचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

 Lotus rush to the ring function | रिंगण सोहळ्याला लोटली गर्दी

रिंगण सोहळ्याला लोटली गर्दी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील रामलीला मैदानावर श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथील आद्यसंत श्री नामदेव महाराजांच्या पालखी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यंदाही पालखीचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
मागील २५ वर्षापासून संत नामदेव येथून निघणाऱ्या पालखीचे हिंगोलीकरांना मोठे आकर्षण असते, या क्षणाची वर्षभरापासून प्रतीक्षा केली जाते. मागील तीन ते चार वर्षांपासून हिंगोलीत रिंगणाची परंपरा निर्माण झाली आहे. हिंगोली पालिकेच्या वतीनेही रिंगणाची तयारी केली होती. यंदा रामलीला मैदानावरील दुकाने हटविल्यामुळे पहिल्यांदाच मैदानाच्या अगदी मधोमध रिंगण करण्यात आले होते. पालखीमध्ये वयोवृद्धांसह १० ते १५ वर्षांखालील मुले सहभागी झाले होते. शिवाय, डोक्यावर तुळस घेऊन महिलांही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. रामलीला मैदानावर नियमितप्रमाणे पालखीची पूजाअर्चा करुन महाआरती घेण्यात आली. नंतर मान्यवरांचा व दिंडीतील सहभागी वारकºयांचा सत्कार करण्यात आला. तर पालखी सोहळ्यातील सहभागी चिमुकल्यांनी विविध देखावे सादर केले. तर भजनी मंडळीनी भजन करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध करुन सोडले. विविध चालींवरील भजने गातानाच पायाचा तालही धरला जात होता. हे दृश्यही मन वेडावणारे होते. नंतर मुख्य असलेल्या रिंगण सोहळ्यास प्रारंभ झाला. यामध्ये मानाचा आश्व फिरविल्यानंतर इतर आश्वांनी रिंगणच दणाणून टाकले. तर बरेच घोडेस्वार घोड्यावर उभे राहून स्वारी करीत होते. त्यामुळे काळजाचा ठोका चुकवणारा हा क्षण अनेकजण डोळ्यात प्राण आणून पाहत होते. तर रिंगण पाहण्यासाठी आलेले महिला आणि पुरुष टाळ्या वाजवून घोडेस्वरांना प्रोत्साहित करीत होते. गतवर्षीपेक्षा यंदा मात्र अश्वांची संख्या वाढली होती.
तर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. ठिकठिकाणी बॅरीकेटस्ही लावले होते.
मान्यवरांची उपस्थिती : ग्रामीणचीही गर्दी
यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी सपत्निक आरती केली. तर उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, तहसीलदार गजानन शिंदे, सीओ रामदास पाटील, नगरसेवक गणेश बांगर, अशोक नाईक, अनिता सूर्यतळ, रामेश्वर शिंदे, बिरजू यादव, गणेश लुंगे, श्रीराम बांगर, दिनेश चौधरी, चंदू लांडगे, खंदारे, लव्हाळे आदी हजर होते.
हा सोहळा पाहण्यासाठी ग्रामीण भागातील वारकरी मंडळीही आली होती. अनेकांनी आपली प्रतिष्ठाने बंद करून रिंगण सोहळ्याला हजेरी लावली होती. तर गर्दीमुळे हा सोहळा पाहण्यास अडचण येत असल्याने काहींनी जवळच्या झाडांच्या आश्रय घेतला.
आज प्रस्थान
रिंगण सोहळा आटोपल्यानंतर शहरातून फिरून ही पालखी कल्याण मंडपम् येथे मुक्कामी होती. या ठिकाणी अनेकांनी पालखी दर्शन घेतले. गुरुवारी सकाळी ही पालखी पुढे मार्गस्थ होणार आहे.

Web Title:  Lotus rush to the ring function

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.