मग्रारोहयोवर पुन्हा वाढले मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:53 AM2018-04-13T00:53:24+5:302018-04-13T00:53:24+5:30

जिल्ह्यात मग्रारोहयो योजनेत पुन्हा एकदा कामे सुरू झाली आहेत. मार्च एण्डच्या तोंडावर ठप्प झालेली कामे आता सुरू झाल्याने मजुरांची संख्या पुन्हा १४ हजारांवर गेली आहे. तर २३२ गामपंचायतींनी कामे सुरू केली आहेत.

 Maghorohiooy again grew up | मग्रारोहयोवर पुन्हा वाढले मजूर

मग्रारोहयोवर पुन्हा वाढले मजूर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात मग्रारोहयो योजनेत पुन्हा एकदा कामे सुरू झाली आहेत. मार्च एण्डच्या तोंडावर ठप्प झालेली कामे आता सुरू झाल्याने मजुरांची संख्या पुन्हा १४ हजारांवर गेली आहे. तर २३२ गामपंचायतींनी कामे सुरू केली आहेत.
मग्रारोहयोच्या कामांबाबत प्रशासन उदासीन असल्याच्या तक्रारी मागील समन्वय व संनियंत्रण समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केल्या होत्या. तर सिंचन विहिरींच्या कामांवरून चांगलेच घमासान झाले होते. मार्च एण्डला तर ही कामे मोठ्या प्रमाणात ठप्प पडली होती. त्यामुळे मजुरांचा आकडा चार ते पाच हजारांवर आला होता. आता पुन्हा मजुरांची संख्या वाढू लागली आहे.
जिल्ह्यातील ५६९ पैकी २३२ ग्रा.पं.मध्ये ही कामे सुरू झाली आहेत. यात ग्रामपंचायतींच्या कामांची संख्या ९६१ तर विविध यंत्रणांच्या कामांची संख्या ९७ एवढी आहे. यामध्ये तालुकानिहाय औंढ्यात २४४ कामांवर ३६५४, वसमतला ४५ कामांवर ५५६ मजूर, हिंगोलीत २९२ कामांवर ४00२ मजूर, कळमनुरीत २६३ कामांवर ३२९१ मजूर, सेनगावात २१४ कामांवर २७५१ मजुरांची उपस्थिती आहे. यात औंढा-५३, वसमत-१८, हिंगोली-५४, कळमनुरी-६९ तर सेनगावातील ३८ ग्रामपंचायतींनी कामे सुरू आहेत.
अनेक ग्रामपंचायतींची उदासीनताच
जिल्ह्यातील ५६९ पैकी केवळ २३२ ग्रामपंचायतींनीच कामे सुरू केल्याने ५0 टक्क्यांपेक्षा जास्त ग्रा.पं.ची या कामांसाठी उदासीनताच दिसून येत आहे. विशेष म्हणजे वसमत तालुक्यात सर्वांत कमी ग्रामपंचायतींचा सहभाग या योजनेत दिसून येत आहे. इतर यंत्रणाही केवळ ९७ कामेच करीत असल्याने त्यांचीही कामे वाढण्याची गरज आहे.

Web Title:  Maghorohiooy again grew up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.