‘डॅशबोर्ड’ तंत्रामुळे महावितरण हायटेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:43 AM2018-02-05T00:43:51+5:302018-02-05T00:43:57+5:30
दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रात अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जात आहे. अचूक व गतिने कामे व्हावीत, यासाठी नव-नवीन योजना आखून कार्यालयीन कामे सुरळीतसाठी आता महावितरणने ‘डॅशबोर्डच्या’ सहाय्याने दैनंदिन कामकाजास सुरूवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रात अत्याधुनिक तंत्राचा वापर केला जात आहे. अचूक व गतिने कामे व्हावीत, यासाठी नव-नवीन योजना आखून कार्यालयीन कामे सुरळीतसाठी आता महावितरणने ‘डॅशबोर्डच्या’ सहाय्याने दैनंदिन कामकाजास सुरूवात केली आहे. मागील एक महिन्यांपासून डॅशबोर्ड तंत्राच्या मदतीने कार्यालयीन कामे केली जात असल्याचे कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातील महावितरणच्या कामांमध्ये सुरळीतता येत असून सर्व कामे आता डॅशबोर्डच्या मदतीने केली जात असल्याची माहिती कार्यकारी अभियंता शांतीलाल चौधरी यांनी लोकमत शी बोलताना दिली. डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करत सर्व माहिती वापरकर्त्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे माध्यम म्हणजेच डॅशबोर्ड होय. डॅशबोर्ड अंतर्गत विविध माहिती आॅनलाईन व एकाचवेळी उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये वीजजोडणी, ग्राहक तक्रारी, ऊर्जा अंकेक्षण, साधन सामुग्रीची उपलब्धता व इतर माहिती उपलब्ध आहे. ग्राहकसेवा केंद्रस्थानी ठेवत महावितरण तंत्रज्ञानाच्या आधारे विविध प्रयोग राबवित आहे. यामध्ये ग्राहकांचा मोबाईल क्रमांक नोंदवून त्यांना 'एसएमएस'द्वारे मीटर रिडींग, वीजबिल यासोबतच वीज बंद राहण्याबाबतची माहितीही दिली जात आहे. डॅशबोर्ड हाताळण्यासाठी राज्यभरातील कर्मचाºयांना या सुविधेच्या वापराचे प्रशिक्षण दिले जात आहे.
तक्रारी : सर्व अचूक माहिती बघता येणार
तक्रारी, दिलेले वीज बिल, ग्राहकांनी केलेला भरणा, जमा झालेली रक्कम, थकबाकी या माहितीचे विश्लेषण महावितरणच्या सर्वच कार्यालयांमध्ये आॅनलाइन उपलब्ध झाले आहे. डॅशबोर्ड प्रणालीमुळे महावितरणची सर्व माहिती अचूक व एकसमान मिळण्यास मदत होणार असल्याचे महावितरणने सांगितले.
वीजवितरण क्षेत्रात झपाट्याने बदल गरजेचा आहे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला तरच महावितरण स्वबळावर सक्षमपणे उभे राहू शकेल. अन्यथा दूरसंचार क्षेत्रासारखी परिस्थिती उदभवू शकते. नवीन तंत्रज्ञानाचा वापर सर्व अधिकारी व कर्मचाºयांनी करण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले.
हिंगोली शहरातील थकीत वीजबिल वसूली मोहिमेस ५ फेबु्रवारीपासून सुरूवात केली जाणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता दिनकर पिसे यांनी सांगितले. बिलभरणा न करणाºयांचा पुरवठा खंडीत केला जाईल.