माळेगाव, पुयना ग्रामपंचायत बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:25 AM2021-01-02T04:25:10+5:302021-01-02T04:25:10+5:30
माळेगाव व पुयना येथील ग्रामस्थांनी एकत्र बसून गावविकास साधण्यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध निवडण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या कारणास्तव गावात ...
माळेगाव व पुयना येथील ग्रामस्थांनी एकत्र बसून गावविकास साधण्यासाठी ग्रामपंचायत बिनविरोध निवडण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या कारणास्तव गावात तंटे होऊ नयेत समाज समाजात तेढ निर्माण होऊ नये, गावात एकी राहावी व गावाचा सर्वांगीण विकास साधावा यासाठी ग्रामपंचायत बिनविरोधचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. माळेगाव ग्रामपंचायत येथे ७ सदस्य बिनविरोध निवडून देण्यात आले आहेत. कळमनुरी तालुक्यात १९ मतदान केंद्रे संवेदनशील
कळमनुरी : तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. ८७५ जागेसाठी २,०८९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मतदान १५ जानेवारी रोजी होणार आहे. तसेच तालुक्यात १९ गावातील मतदान केंद्र संवेदनशील आहेत. यामध्ये आखाडा बाळापूर, कळमनुरी या दोन पोलीस ठाणे प्रमुखांनी आपल्या हद्दीतील मतदान केंद्र संवेदनशील असल्याचा अहवाल तहसील कार्यालयाला दिलेला आहे. कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीतील नांदापूर, सालेगाव, पाळोदी, गौळबाजार, सोडेगाव, सेलसुरा, चिंचोर्डी ही सात गावे संवेदनशील आहेत. आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीतील बऊर, रामेश्वर तांडा, पोतरा, हिवरा, दांडेगाव, शेवाळा, डोंगरकडा, तोंडापूर, आखाडा बाळापूर, सिंदगी, साळवा, जवळा पांचाळ या बारा गावातील मतदान केंद्रे संवेदनशील आहेत.
१०९ ग्रामपंचायतीसाठी ३५४ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी काही गावातील निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. संवेदनशील मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी पोलिसांची जादा कुमक ठेवण्यात येणार असून पोलिसांची करडी नजर राहणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे ही बसविण्यात येणार आहेत.