हिंगोली पालिकेच्या सभेत रंगले मानापमाननाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:41 AM2018-02-06T00:41:09+5:302018-02-06T11:40:59+5:30

नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मानापमान नाट्य चांगलेच रंगले. मात्र सगळे काही निमूटपणे सहन करीत अखेर खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पाडत स्वत:च्याच पायावर दगड मारून घेण्याचे नगरसेवकांनी टाळले.

 Manpamanatya painted in the meeting of the corporation | हिंगोली पालिकेच्या सभेत रंगले मानापमाननाट्य

हिंगोली पालिकेच्या सभेत रंगले मानापमाननाट्य

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मानापमान नाट्य चांगलेच रंगले. मात्र सगळे काही निमूटपणे सहन करीत अखेर खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पाडत स्वत:च्याच पायावर दगड मारून घेण्याचे नगरसेवकांनी टाळले.
नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, सीओ रामदास पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत नगरसेवक सुरुवातीपासूनच आक्रमक होते. या आक्रमकतेमुळे सभेच्या सुरुवातीलाच शाब्दीक चकमकी झाल्या. त्यामुळे बंद दरवाजा आड होणारे नगरसेवक बाहेर आले. त्यानंतर सत्ताधारी व विरोधकांत ‘तू-तू... मै-मै..’ झाली. यात सत्ताधाºयांनी मग नगरसेविकांऐवजी त्यांचे प्रतिनिधी कसे आले? असा सवाल करताच नूर पालटला. मात्र सभेत नगरसेवक आक्रमकच होते. शिवाय विकास कामांच्या निविदा काढण्यास मंजुरी असा मोघम ठराव न घेता प्रत्येक काम वाचवून दाखविण्याची वेळ प्रशासनावर पहिल्यांदाच आली. नंतर यातील कामे वाढली नाही पाहिजे, असा गर्भित इशाराही काही नगरसेवकांनी दिला. ठरावीक भागातच कामे होत असल्याचा आरोप करून काही नगरसेवकांची नाराजी मागील काही दिवसांपासून सभागृहाबाहेर उमटतच होती. आज समान निधी वाटपाची मागणी करून त्यावर जोरदार चर्चाही घडवून आणण्यात यश मिळविले. तर स्वच्छतेचे आॅटोही असेच काही भागातच फिरत आहेत. काही भागात ते येतच नसल्याचा आरोपही नगरसेवकांनी केला. यात बदल करून सर्व भागातील साफसफाईला सारखे प्राधान्य देण्याची मागणीही केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर नगरपालिकेचा निधी टाकण्यास विरोध करून ही कामे रद्द करण्यात आली. तर शहरातील रस्त्यांवर मुरुम टाकण्याची निविदाही रद्द केल्याचे सांगण्यात आले. इंदिरा गांधी पुतळ्याच्या सुशोभिकरणाची मागणीही केली. त्यावर हे काम करण्यात येईल, असे सांगण्यात आले. तर आजम कॉलनी भागातील शॉपिंग कॉम्प्लेक्सला भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा ठराव घेण्यात आला. नगरसेवक नेहालभैय्या व नगरसेविका स. नाजनीन जावेद यांनी ही मागणी केली.
एकंदर आजच्या सभेत बºयाच जणांनी पदाधिकारी अथवा प्रशासनाशी असलेले उट्टे काढण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना थोडी दमछाक सोसावी लागली. मात्र विविध कामांचे ठराव या सभेत होणार असल्याने ही सभाच उधळण्याचा त्यांचा प्रयत्न मात्र फसला.
इंदिरा गांधी चौक ते पोलीस ठाण्यापर्यंत साईड पट्टा रस्ता, डम्पिंग ग्राऊंडवर अंतर्गत, रात्रनिवाºयास जागा घेवून बचत गटास चालवायला देणे, १ एप्रिलपासून शहरात युजर चार्जेस कर लावणे, न.प.च्या अभ्यासिकेसाठी शुल्क व खुर्च्या खरेदी, न.प.च्या विविध विभागांच्या वार्षिक निविदा काढणे
रमाई घरकुल योजनेतील अर्ज मंजुरीसाठी सहायक समाजकल्याण आयुक्तांकडे पाठविणे, न.प.तील जनरेटरची त्रिवार्षिक देखभालीसाठी कंत्राटी सेवा पुरविणे, डम्पिंगवर विद्युतीकरण, आठवडी बाजार विकास आदी ठराव आहेत.
मंगळवारा भागात शेतकी भवन उभारणे, जिल्हाधिकारी निवासस्थान ते अकोला हायवेपर्यंत डांबरीकरण आदी ठरावही घेण्यात आले आहेत. तर काही ठराव रद्दही केल्याचे सांगितले जात आहे.

Web Title:  Manpamanatya painted in the meeting of the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.