वसमत तालुक्यात अनेक गावांना भूकंपाचा धक्का; गूढ आवाजाने झोपेतील लोकं जागे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 10:39 AM2023-01-08T10:39:06+5:302023-01-08T10:41:03+5:30
६ ते ७ वर्षापासून सतत भुकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांत आता भिती व्यक्त केल्या जात आहेत
इस्माइल जहागीरदार
वसमत(हिंगोली): तालुक्यातील अनेक गावांना रविवार च्या पहाटे ४.३१ मि ला भुगर्भातुन मोठा आवाज येत भुकंपाचा सौम्य धक्का जानवला आहे, भुकंपाच्या धक्कयाने तालुक्यात कोठेच हानी व नुकसान झाले नसल्याची माहिती तहसिल प्रशाशनाने दिली. ६ ते ७ वर्षापासून सतत भुकंपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांत आता भिती व्यक्त केल्या जात आहेत
वसमत तालुक्यातील वसमत,कुरुंदा,गिरगाव,कवठा, वर्ताळ,डोणवाडा,सेलु,पार्डी, कोठारी,पांग्रा शिंदे,वापटी,कुपटी,शिरळी यासह औढानागनाथ व कळमनुरी तालुक्यातील ही अनेक गावांना ८ जानेवारी च्या पहाटे ४.३१ मि दरम्यान भुगर्भातुन मोठा आवाज येत जमिन हादरली. येथील तिन्ही तालुक्यातील अनेक गावांना गत ६ ते ७ वर्षांपासून भुकंपाचे धक्के सतत जाणवत आहेत, यापूर्वी दोन वेळेस भुकंपाची नोंददेखील झाली आहे. सतत भुकंपाचे धक्के जाणवत आसल्याने नागरिकांत भिती व्यक्त केल्या जात आहेत. रविवार रोजी पहाटे जाणवलेल्या भुकंपाच्या धक्कयात कोठेही हानी व नुकसान झाली नसली तरीही नागरिक भयभीत झाले आहेत
८ जानेवारीच्या पहाटे ४.३१ मिनिटांनी तालुक्यातील बहुतांश गावाना भुकंपाचा धक्का बसला आहे. भुकंपाची नोंद झाली का याची माहिती घेणे चालू आहे. भुकंपाच्या धक्क्याने हानी व नुकसान झाले नाही, महसुल पथके पाहाटपासुन सर्वत्र फिरुन माहिती घेत आहेत, असे तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी सांगितले.