Marashatra Bandh : सेनगाव येथे आंदोलनाला हिंसक वळण; स्कूल बस व जीप पेटवली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 07:23 PM2018-08-09T19:23:12+5:302018-08-09T19:30:10+5:30

मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला सेनगाव येथे हिंसक वळण लागले. बंद दरम्यान एक स्कूल बस व एक खाजगी जीप जाळण्यात आली.

Marashatra Bandh: Bandh turns Violent at Sengav; School Bus and Jeep burnt | Marashatra Bandh : सेनगाव येथे आंदोलनाला हिंसक वळण; स्कूल बस व जीप पेटवली 

Marashatra Bandh : सेनगाव येथे आंदोलनाला हिंसक वळण; स्कूल बस व जीप पेटवली 

Next

सेनगाव (हिंगोली ) : मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला सेनगाव येथे हिंसक वळण लागले. बंद दरम्यान एक स्कूल बस व एक खाजगी जीप जाळण्यात आली. तसेच इतर दोन वाहनांची तोडफोड करण्यात आली.

महाराष्ट्र बंदचे तीव्र पडसाद सेनगावात उमटले. या दरम्यान शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती. दुपारी १ वाजेच्या सुमारास आजेगाव रस्त्यावर एका खाजगी जीपला आग लावण्यात आली. तसेच एका शाळेच्या आवारात उभी असलेली एक स्कूल बससुद्धा जाळण्यात आली. या दोन्ही घटनांमुळे तणावपूर्ण वातावरण होते. 

आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर दिवसभर रास्ता रोको केला. यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प होती. आंदोलकांनी मुख्य रस्त्यांवर झाडे तोडून टाकत रास्तारोको करण्यात आला. तालुक्यातील पानकनेरगाव, पुसेगाव, खुडज, भानखेडा, कवठा पाटी, साखरा आदी ठिकाणी रास्तारोको करून कडकडीत बंद पाळण्यात आला. 

Web Title: Marashatra Bandh: Bandh turns Violent at Sengav; School Bus and Jeep burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.