मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, नैराश्यात युवकाने संपवले जीवन
By यशवंत भीमराव परांडकर | Updated: July 22, 2024 17:36 IST2024-07-22T17:35:20+5:302024-07-22T17:36:24+5:30
राहत्या घरी गळाफास घेऊन संपवले जीवन

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, नैराश्यात युवकाने संपवले जीवन
- इब्राहीम जहागिरदार
कुरुंदा (जि. हिंगोली) : मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून नैराश्यातून वसमत तालुक्यातील पांगारा (शिंदे) येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. २२) उघडकीस आली.
पांगरा (शिंदे) येथील मुंजाजी गणेश शिंदे (२८) या युवकाने मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही या नैराश्यापोटी आपल्या राहत्या घरी गळाफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. मराठा समाजाला आरक्षण नसल्याने आत्महत्या करीत आहे, अशी चिठ्ठी मयत युवकाच्या खिशात आढळून आली.
या प्रकरणी युवकाच्या शवाचे विच्छेदन पांगारा (शिंदे) येथील आरोग्य केंद्रात करण्यात आले. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, बीट जमादार बबन देवकर, वसमतकर आदींनी भेट दिली. मयत युवकाच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.