मराठा शिवसैनिक सेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:37 AM2019-01-04T00:37:49+5:302019-01-04T00:38:31+5:30
हिंगोली जिल्हा तसेच औंढा व वसमतसह दुष्काळ जाहीर करण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांना प्रतिएकरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई देऊन डीपी तात्काळ दुरूस्त करून देण्यात याव्यात यासह विविध मागण्यांसाठी मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने ३ जानेवारी रोजी आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : हिंगोली जिल्हा तसेच औंढा व वसमतसह दुष्काळ जाहीर करण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांना प्रतिएकरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई देऊन डीपी तात्काळ दुरूस्त करून देण्यात याव्यात यासह विविध मागण्यांसाठी मराठा शिवसैनिक सेनेच्या वतीने ३ जानेवारी रोजी आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद करण्यात येणार होते. परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी गेट बंद करून घेतले. शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर संस्थापक अध्यक्ष तथा रासपाचे विनायक भिसे यांनी आवाज उठविला. शेतकºयांना आर्थिक मदत देण्यात यावी, गुरांच्या चारापाणी यासंदर्भात उपाय-योजना करण्यात याव्यात यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केले. यावेळी पप्पू चव्हाण, गजानन पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा शिवसैनिक सेनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.