विवाहितेची आत्महत्या; सासरच्या ६ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:21 AM2021-06-17T04:21:07+5:302021-06-17T04:21:07+5:30
हिंगोली तालुक्यातील येथील रमा सिद्धार्थ भोरगे हीस पती सिद्धार्थ, सासू देवूबाई, सासरा दलित, दीर भीमा, जाऊ इंदू भोरगे यांच्यासह ...
हिंगोली तालुक्यातील येथील रमा सिद्धार्थ भोरगे हीस पती सिद्धार्थ, सासू देवूबाई, सासरा दलित, दीर भीमा, जाऊ इंदू भोरगे यांच्यासह मावस सासरा शिवाजी घोंगडे सर्व रा.केसापूर यांनी ४ फेब्रुवारी २०१९ पासून ते आजतागायत विविध कारणांनी त्रास दिला. तू आंधळी आहेस, तुझ्या माहेराहून पैसे आण व घर बांध. त्याच घरात तू राहा व आमच्या घरात राहू नको, असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला. या छळास कंटाळून रमाने घरातील लाकडी बल्लीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार तिची नातेवाईक कांताबाई सोपान बलखंडे यांनी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून हुंड्यासाठी छळासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. सपोनि गिरी तपास करीत आहेत.