सेनगावात अकरा दिवसानंतर बाजार समिती सुरु; केवळ नॉन एफ.ए.क्यू शेतमालाचेच होणार व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 02:21 PM2018-09-12T14:21:44+5:302018-09-12T14:24:06+5:30

तब्बल अकरा दिवसानंतर आज कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतमाल खरेदी चे व्यवहार सुरू करण्यात आले.

Market Committee begins after eleven days Sengaon; Only non-FAQ products will be conducted | सेनगावात अकरा दिवसानंतर बाजार समिती सुरु; केवळ नॉन एफ.ए.क्यू शेतमालाचेच होणार व्यवहार

सेनगावात अकरा दिवसानंतर बाजार समिती सुरु; केवळ नॉन एफ.ए.क्यू शेतमालाचेच होणार व्यवहार

Next

सेनगाव (हिंगोली ) : तब्बल अकरा दिवसानंतर आज कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतमाल खरेदी चे व्यवहार सुरू करण्यात आले. प्रामुख्याने नाँन एफ.ऐ.क्यू दर्जा चा शेतमालाचे व्यवहार सुरू करण्यात आले  असल्याची माहिती बाजार समिती सचिव दत्तात्रय वाघ यांनी दिली.

शासनाने हमी भावा पेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी केल्या संबंधी गंभीर स्वरूपाची फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेतलाने या विरोधात भुसार असोशियनचा वतीने खरेदी बंद केली होती. मागील अकरा दिवसापासून शेतमालाची खरेदी बंद आंदोलन सुरू होते. त्यामुळे ऐन  सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांसमोर शेतमालाची विक्री करण्याची अडचण निर्माण झाली होती. या संबंधी पूर्णपणे तोडगा निघाला नसला तरी दुय्यम दर्जाच्या शेतमालाची खरेदी करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आज भुसार असोसिएशनचा वतीने येथील आंदोलन मागे घेण्यात आले.

प्रांरभी नॉन एफ.ऐ.क्यू दर्जाच्या शेतमालाची खरेदी करण्यावर तोडगा निघाला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे एफ.ऐ.क्यू दर्जाचा शेतमाल अशा शेतकऱ्यांनी हमीभाव  किमतीकरीता नाफेडच्या खरेदी केंद्रावर विक्री करावी अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. बाजार समितीमध्ये आधारभूत किमतीवर शेतमालाची खरेदी करण्यासाठी हमी भाव केंद्र सुरू करावे असे पत्र नाफेडला देण्यात आले आहे. त्यामुळे सदर केंद्र सुरू झाल्यावरच शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार आहे. शेतकऱ्यांनी नॉन एफ.ऐ.क्यू दर्जाचा शेतमाल विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समिती सचिव दत्तात्रय वाघ यांनी केले आहे. खरेदी व्यवहार सुरू झाल्याने मोंढा पुन्हा गजबजला आहे.

Web Title: Market Committee begins after eleven days Sengaon; Only non-FAQ products will be conducted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.