विवाहित तरुणीस जवानाने घटस्फोट घेण्यास भाग पाडले; नंतर अत्याचार करून सोडून दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:54 PM2021-02-10T16:54:11+5:302021-02-10T16:55:37+5:30

सैन्य दलातील जवानाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

A married young woman was forced into a divorce by a soldier; Then raped and released | विवाहित तरुणीस जवानाने घटस्फोट घेण्यास भाग पाडले; नंतर अत्याचार करून सोडून दिले

विवाहित तरुणीस जवानाने घटस्फोट घेण्यास भाग पाडले; नंतर अत्याचार करून सोडून दिले

googlenewsNext

आखाडा बाळापूर : लग्नाचे आमिष दाखवत एका विवाहित तरुणीला सैन्य दलातील जवानाने घटस्फोट घेण्यास भाग पाडले. त्यानंतर जवानाने तिला वारंवार नांदेड येथे नेऊन मद्य पाजून अत्याचार केले. दरम्यान, तिच्याशी खोटे लग्न करून माझे आईवडील तुझ्यासोबत लग्नाला तयार होणार नाहीत असे घुमजाव करत जवान तिला सोडून निघून गेला. यामुळे व्यथित पिडीतेने जवानाविरुद्ध आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील कसबे धांवडा येथिल भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेला जवान गौतम खिल्लारे हा गावाकडे सुट्टीच्या निमित्ताने आला होता. या दरम्यान, एका विवाहित तरुणीशी त्याने जवळीक साधली. माझा वाढदिवस कोणी साजरा करत नाही. तू माझ्यासोबत माझा वाढदिवस साजरा कर असे म्हणून तिला नांदेडला हॉटेलवर घेऊन गेला. तिथे जबरदस्तीने तिला मद्य पाजले.नशेत असताना तिला एका बंद खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. 

तसेच लग्नाचे आमिष देऊन त्याने तरुणीस पहिले लग्न मोडण्यास भाग पाडले. पहिल्या नवर्‍याशी फारकत घेतल्यानंतर तिला नांदेडमध्ये भाड्याची खोली घेऊन ठेवले. येथेच दोघांनी लग्न केले. येथे पुन्हा तरुणीस मद्य पाजून जवानाने तिच्यावर अत्याचार केले. जवानाने 1 ऑगस्ट 2019 पासून ते 12 ऑगस्ट 2020 पर्यंत वारंवार तिच्यावर अत्याचार केला. मात्र, लग्नानंतर अचानक घूमजाव करत माझ्या आई-वडिलांना तुझ्यासोबत लग्न केलेले आवडणार नाही असे सांगून जवान पिडीतेला सोडून निघून गेला. यानंतर पिडीतेने बाळापुर पोलीस ठाणे गाठले व जवानाविरुद्ध तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे यांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Web Title: A married young woman was forced into a divorce by a soldier; Then raped and released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.