मंगल कार्यालय चालकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:43 AM2021-02-26T04:43:22+5:302021-02-26T04:43:22+5:30
जिल्ह्यात कोरोना साथ पसरत असल्याने जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू केला आहे. लग्न समारंभ आयोजित करण्यासाठी जिल्हा ...
जिल्ह्यात कोरोना साथ पसरत असल्याने जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू केला आहे. लग्न समारंभ आयोजित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी बंधनकारक केली आहे. शहरातील खटकाळी भागातील ओमसाई मंगल कार्यालयात २५ फेब्रुवारी रोजी विना परवाना लग्न समारंभ आयोजित केल्याची माहिती शहर पोलिसांना समजताच दुपारी २ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे आदी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे दिसून आले. तसेच मास्कही लावलेले आढळून आले नाही. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख यांच्या फिर्यादीवरून मंगल कार्यालय मालक राजेश्वर सिद्धराम तुंगेनवार (रा. मंत्रीनगर, भावसार चौक, नांदेड) व व्यवस्थापक राम तुकाराम मुंढे (रा. हिवरा बेल) यांच्याविरुद्ध पोलीस नाईक जीवन मस्के यांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन केणेकर करीत आहेत.