मास्कमुळे त्वचेला सुटतेय खाज ! काय करु ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:31 AM2021-07-27T04:31:05+5:302021-07-27T04:31:05+5:30
हिंगोली : कोरोना महामारी होऊ नये, यासाठी मास्क घालणे आवश्यक आहे. परंतु, काही नागरिक एकच मास्क दोन-दोन दिवस वापरतात. ...
हिंगोली : कोरोना महामारी होऊ नये, यासाठी मास्क घालणे आवश्यक आहे. परंतु, काही नागरिक एकच मास्क दोन-दोन दिवस वापरतात. त्यामुळे घाम येऊन खाज आल्यासारखे वाटते. परंतु, दीड वर्षात अजून एकही रुग्ण ‘त्वचेला खाज आली ’ या प्रकाराचा आढळला नाही. मास्क जर रोजच्या रोज बदलला तर खाज येत नाही. घामामुळे अनेकांना खाजा येत आहे. कापडी मास्क असेल तर स्वच्छ साबणाने धुवावा, कापड व्यतिरिक्त मास्क असतील बदलणे हे अत्यंत आवश्यकच आहे.
प्रतिक्रिया....
त्वचाविकाराचे रुग्ण नाहीत
कोरोनापासून बचाव करण्यासाठीच मास्क आवश्यक आहे. मास्कमुळे खाज येत नाही तर घामामुळे खाज येते. मास्कमुळे विषाणू पोटात जात नाहीत.
- डाॅ. महारुद्र भोसले, त्वचारोग तज्ज्ञ
कापडी मास्क असेल तर स्वच्छ धुवा. इतर प्रकारचे मास्क असतील तर नागरिकांनी रोज बदलणे आवश्यक आहे. मास्कमुळे त्वचेला खाज येत नाही.
- डाॅ. शिवाजी गिते, त्वचारोग तज्ज्ञ
सॅनिटायझर, साबण ही वापरा
अलूईवरा आणि ग्लिसरीन असलेले सॅनिटायझर नागरिकांनी वापरावे. साबण पेक्षा सॅनिटायझर चांगलेच आहे.
नोकरीवर असलेल्यांनी सॅनिटायझर वापरावे आणि घरी राहणाऱ्यांनी साबण वापरले तरी चालेल.