सामूहिक विवाह सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 11:58 PM2018-04-05T23:58:03+5:302018-04-05T23:58:03+5:30
धर्मादाय आयुक्त मुंबई व सहा. धर्मादाय आयुक्त हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली व हरिओम कृषी शिक्षण विकास संस्था, कोथळज लोक कल्याणक उपक्रमात १०१ जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन हनुमान मंदिर खटकाळी येथे ६ मे रोजी दुपारी १२.१८ वाजता करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : धर्मादाय आयुक्त मुंबई व सहा. धर्मादाय आयुक्त हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली व हरिओम कृषी शिक्षण विकास संस्था, कोथळज लोक कल्याणक उपक्रमात १०१ जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन हनुमान मंदिर खटकाळी येथे ६ मे रोजी दुपारी १२.१८ वाजता करण्यात आले आहे.
सदर उपक्रमात जिल्हावासियांना १०१ कन्यादान, अन्नदान व वºहाडीची सुव्यवस्था करावयाची संधी मिळत आहे. हा कार्यक्रम सामूहिक प्रयत्नातून शक्य आहे. सामाजिक व धार्मिक संस्थेद्वारे सहकार्य करून या सामुहिक विवाह सोहळ्यात जोडप्यांना कपडे, मणीमंगळसूत्र, अन्नदान, कार्यरुपी आशिर्वाद व जोडप्यांना गृहउपयोगी साहित्य देवून कन्यादान व अन्नदान तसेच त्यांना सर्वांनी वैयक्तिक मदत, रोख व वस्तू स्वरुपात, मदत करून या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दिलीप घुगे यांनी केले.