जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ प्रचंड मोर्चा

By Admin | Published: November 11, 2014 03:33 PM2014-11-11T15:33:04+5:302014-11-11T15:33:04+5:30

जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी निघालेल्या मोर्चामध्ये शहराच्या विविध भागांतील आंबेडकरी जनता मोठय़ा संख्येने सहभागी झाली होती

A massive rivalry against the condemnation of the Jawkheda massacre | जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ प्रचंड मोर्चा

जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ प्रचंड मोर्चा

googlenewsNext
शांतता व सनदशीर मार्गाने मांडली प्रखर निषेधाची भूमिका
जवखेडा हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी निघालेल्या मोर्चामध्ये शहराच्या विविध भागांतील आंबेडकरी जनता मोठय़ा संख्येने सहभागी झाली होती. सकाळी ११ वाजल्यापासूनच विविध भागातील समुदायाने लोक एकत्रित येत होते. प्रचंड मोठी संख्या व मोर्चातील प्रखर निषेधाची भूमिका लक्षवेधी होती. परंतु तितक्याच शांतता व सनदशीर मार्गाने हा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. नांदेड : अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथे झालेल्या दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ नांदेडमध्ये सोमवारी काढण्यात आलेला महामोर्चा शांततेत पार पडला. हजारोंच्या संख्येने या मोर्चात तरूण व महिला सहभागी झाल्या होत्या. 
जवखेडा येथील जाधव कुटुंबियांच्या मारेकर्‍यांना त्वरित अटक करावी, या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी आदी मागण्यांसाठी तरोडा, देगावचाळ, हडको, इतवारा आदी भागातून मोर्चा काढण्यात आला होता. दुपारी १२ च्या सुमाराच्या या मोर्चांना प्रारंभ झाला. वजिराबाद चौकात विविध भागातून निघालेल्या या मोर्चाचे एकत्रिकरण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी चौक, शासकीय रूग्णालय मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. महात्मा फुले पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चात विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. निळ्या ध्वजासह पंचरंगी ध्वज हातात घेवून तरूण वर्ग महिलांनी शासनाच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आल्यानंतर या मोर्चाला भदंत पय्याबोधी, भदंत संघपाल, भदंत आनंदबोधी यांनी मार्गदर्शन केले. बुद्धांच्या शांततेच्या मार्गाने निषेध करणे हे आंबेडकरी अनुयायांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. या मोर्चाला कुठेही गालबोट लावू नका असे सांगताना त्यांनी आक्रमक तरूण वर्गाला शांत केले. 
या मोर्चात भदंत पय्याबोधी, भदंत संघपाल, भदंत शीलरत्न, भदंत जीनरत्न, भदंत संघप्रिय, भदंत आनंदबोधी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. कोणत्याही पक्ष अथवा संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नसल्यामुळे तरूण वर्गाने मोठय़ा संख्येने हजेरी लावली होती. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांना निवेदन दिल्यानंतर त्याबाबतची माहिती मोर्चेकर्‍यांना रमेश सोनाळे, सुभाष रायबोले यांनी दिली. 
या मोर्चात आ. अमरनाथ राजूरकर, बापूराव गजभारे, प्रफुल्ल सावंत, रमेश सोनाळे, श्याम निलंगेकर, गौतम गजभारे, रमेश गोडबोले, डॉ. करूणा जमदाडे, रमेश सरोदे, नरेंद्र गायकवाड, संघरत्न खंदारे, सुखदेव चिखलीकर, बाळू राऊत, प्रकाश कामळजकर, मनीष कावळे, राज सोनसळे, साहेबराव गायकवाड, मोहन गर्दनमारे, दुष्यंत सोनाळे, रवी कसबे, अजय शेळके, राजू लांडगे, संघरत्न कांबळे, गणेश तादलापूरकर, प्रकाश वागरे, दिगांबर ढोले, बाळासाहेब देशमुख, गौतम पवार, प्रीतम जोंधळे, अनिल बिर्‍हाडे, संदीप सोनकांबळे, डी. पी. गायकवाड, मंगेश कदम, उपेंद्र तायडे, श्याम कांबळे, जयपाल ढवळे, विजयानंद पोवळे, देवानंद सरोदे, प्रशांत इंगोले, शिल्पा नरवाडे, अनिता हिंगोले, महादेवी मठपती, अपर्णा साळवे, लक्ष्मी वाघमारे, सुषमा थोरात आदींची उपस्थिती होती. अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले यांच्यासह सहायक पोलिस अधीक्षक देशमुख यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा जिल्हा कचेरीसमोर हजर होता. /(प्रतिनिधी)

 

Web Title: A massive rivalry against the condemnation of the Jawkheda massacre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.