कायदा व सुव्यवस्थेबाबत औंढा येथे बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:24 AM2021-01-09T04:24:42+5:302021-01-09T04:24:42+5:30
यावेळी पोनि वैजनाथ मुंडे, नायब तहसीलदार सचिन जोशी, एपीआय गजानन मोरे, सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक सिद्दिकी, जमादार गणेश नरोटे, यशवंत ...
यावेळी पोनि वैजनाथ मुंडे, नायब तहसीलदार सचिन जोशी, एपीआय गजानन मोरे, सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक सिद्दिकी, जमादार गणेश नरोटे, यशवंत गुरुपवार, लिपिक संजय पाटील, गणेश लेकुळे, आदींसह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
तहसीलदार कृष्णा कानगुले यांनी निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व संवेदनशील गाव मतदान केंद्रावर भेटी देण्याच्या सूचना दिल्या. औंढा तालुक्यात ७१ ग्रामपंचायतच्या २१४ बुथवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. औंढा पोलीस ठाण्याअंतर्गत ३३, हट्टा पोलीस ठाणे १५, कळमनुरी ११, कुरुंदा ७, बासंबा ४, ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत १ गावांचा समावेश आहे. त्यामुळे या ठाण्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन येणाऱ्या काळात आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, कुठेही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासंदर्भात बैठकीत मार्गदर्शन व सूचना करण्यात आल्या. फाेटाे नं.२१